Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satara Attack : मैत्रिणीसोबत बोलल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार, हल्ल्यात पीडित गंभीर जखमी

शनिवार पेठ येथे सोमवारी संध्याकाळच्या सुमारास रोहित सोनटक्के वाघाची नळी परिसरात गाडीवरून जात होता. यावेळी अचानक समोरून संशयित ऋषिकेश पंडित हा मित्रांसोबत त्या ठिकाणी आला. ऋषिकेशने रोहित सोनटक्के यास बेदम मारहाण करत कोयत्याने अंगावर वार करण्याचा प्रयत्न केला.

Satara Attack : मैत्रिणीसोबत बोलल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार, हल्ल्यात पीडित गंभीर जखमी
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 1:18 AM

सातारा : मैत्रिणीसोबत बोलत असल्याच्या रागातून एका तरुणा (Youth)वर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) केल्याची घटना साताऱ्यातील शनिवार पेठ येथे असलेल्या वाघाची नळी परिसरामध्ये घडली आहे. रोहित सोनटक्के असे हल्ला करण्यात आलेल्या पीडित तरुणाचे नाव असून तो मल्हारपेठ येथील रहिवासी आहे. ऋषिकेश पंडित असे संशयित आरोपीचे नाव असून तोकरंजे गावतील रहिवासी आहे. या हल्ल्यात रोहित सोनटक्के हा तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. (Attack on youth in Satara out of personal anger victim suffered serious injuries)

पीडित तरुण गंभीर जखमी

शनिवार पेठ येथे सोमवारी संध्याकाळच्या सुमारास रोहित सोनटक्के वाघाची नळी परिसरात गाडीवरून जात होता. यावेळी अचानक समोरून संशयित ऋषिकेश पंडित हा मित्रांसोबत त्या ठिकाणी आला. ऋषिकेशने रोहित सोनटक्के यास बेदम मारहाण करत कोयत्याने अंगावर वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने हाताने अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या हातावर कोयता बसल्याने तो जखमी झाला आहे. या प्रकारानंतर संबंधित संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. जखमीला तात्काळ स्थानिकांनी साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र युवकाला झालेले वार गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे. यामुळे वाघाची नळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या सर्व घडलेल्या घटनेची तक्रार रोहितने शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली असून या घटनेचा तपास शाहुपुरी पोलिस करत आहे. (Attack on youth in Satara out of personal anger victim suffered serious injuries)

इतर बातम्या

VIDEO : कफ परेड परिसरात भरधाव गाडीने चार जणांना उडवले; अपघाताची भीषण घटना CCTV मध्ये कैद

Wardha Murder : वर्ध्यात चारित्र्याच्या संशयातून दगडाने ठेचून पत्नीची हत्या, आरोपी पतीला अटक

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....