Video | पेट्रोल भरताना सतर्क राहा! साताऱ्यात पेट्रोल भरताना बाईक पेटली, चक्क सिलिंडरच फोडावा लागला

साताऱ्यात पेट्रोल पंपावर ही घटना अचानकपणे घडली. यावेळी सिलिंडर फोडून आग विझवण्यात आली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. चक्क पेट्रोल पंपाने पेट घेतला असता. मात्र जावेद शेख यांनी हजरजबाबीपणा दाखवल्यामुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली. 

Video | पेट्रोल भरताना सतर्क राहा! साताऱ्यात पेट्रोल भरताना बाईक पेटली, चक्क सिलिंडरच फोडावा लागला
satara vehicle fire
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 1:50 PM

सातारा : सातारा शहरातील पोवई नाक्यावरील रेणूका पेट्रोल पंपावर (Petrol Pump) एक अजब घटना घडली आहे. येथे पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका महिलेच्या दुचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. अचानकपणे पेट घेतल्यामुळे काय करावे हे येथील लोकांना समजले नाही. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या इतर वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान त्या ठिकाणी असणारे कर्मचारी जावेद शेख यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून फायर फायटरचा सिलिंडर ( Fire Extinguisher) फोडून तत्काळ आग विझविली त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. जावेद शेख याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. साताऱ्यात पेट्रोल पंपावर ही घटना अचानकपणे घडली. यावेळी सिलिंडर फोडून आग विझवण्यात आली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. चक्क पेट्रोल पंपाने पेट घेतला असता. मात्र जावेद शेख यांनी हजरजबाबीपणा दाखवल्यामुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली.

प्रवाशांनी काळजी घेण्याचे आवाहन 

या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. यामध्य महिलेच्या दुचाकीने पेट घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान, अशा घटना घडू नये म्हणून प्रवाशांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आगीची घटना घडलीच तर वेळीच आग विझवण्यासाठी आग विझवणाऱ्या सिलिंडरचा वापर करावा असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

Kolhapur | विक्रीस आणलेल्या 8 इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक, लाखोंचे नुकसान

OBC Reservation | ओबीसी आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी का केली नाही सही, भुजबळ म्हणतात…!

Pune Municipal Corporation| पुणे महानगरपालिकेचा प्रा-रूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध होण्यापूर्वीच फूटला , अन… उडाला एकच गोंधळ ; नेमकं काय झालं?

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.