साताराः राज्यातील पोटनिवडणुकांचे निकाल लागताच राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.वेगवेगळ्या मुद्यावरून राजकारण तापलेले असतानाच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सध्या कोल्हापूर नंतर सातारा दौऱ्यावर आहेत. सातारा दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी छत्रपती घरण्यावर आणि भाजपवरही टीका केली. त्यानंतर भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर देत संजय राऊत यांना छत्रपती घराण्यार बोलायचा अधिकार नाही अशा शब्दात त्यांनी त्यांना सुनावलं आहे.
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्यु्त्तर देताना ते म्हणाले की, संजय राऊत आणि ठाकरे गटाला छत्रपती घराण्याबद्दल एवढा आदर होता.तर त्यांनी तो आदर राज्यसभेच्यावेळी का ठेवला नाही.
कोल्हापूरच्या संभाजीराजे यांना राज्यसभेचं तिकीट न देता ते त्यांना का डावलण्यात आले. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती घराण्याबद्ददल न बोललेच बरं असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.
जे संजय राऊत आज छत्रपती घराण्याबद्दल बोलतात त्यांना तो अधिकारच नाही असं म्हणत त्यांनी सातारा आणि कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यांचा राजकीय इतिहास सांगितला. यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यावर ठाकरे घराण्याने अन्याय केला आहे.
मात्र भाजपने तसं होऊ दिले नाही.देशाच्या पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र मोठं काम केले आहे. तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांनीही काम मोठं केले आहे. त्यांच्यामुळेच आम्ही आज आमदार असल्याचेही त्यानी सांगितलं.
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल गौरवोद्गगारही काढले आहेत. त्यांच्यासारख्या कतृत्वावान माणसामुळे राज्यातील भाजप आणि देशातील भाजप नरेंद्र मोदी यांच्यामुळे घोडदौड करत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.