परदेशी कशाला जायाचं गड्या…; ‘तो’ व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

CM Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray Shared Daregoan Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक व्हीडिओ ट्विटरवर शेअर केलाय. या व्हीडिओच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे काय म्हणाले? वाचा सविस्तर......

परदेशी कशाला जायाचं गड्या...; 'तो' व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
CM Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray
Follow us
| Updated on: May 30, 2024 | 1:43 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स (ट्विटर)वर एक व्हिडिओ शेअर केलाय. एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील दरेगाव या त्यांच्या मूळगावी आहेत. तिथे त्यांनी शेतात जात पाहणी केली. याचा व्हिडिओ एकनाथ शिंदेंनी ट्विट केला आहे. लोकसभा निवडणुकीची धावपळ, प्रचार सभा या सगळ्यातून थोडा वेळ मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे दरेगावी गेलेत. तिथे शेतातील पिकांची पाहणी त्यांनी केली. जनावरांना खाऊ घातलं. मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. पण हा व्हिडिओ शेअर करताना शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंना टोला

लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या या परदेश दौऱ्यावरून विरोधकांनी टीका केली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एक व्हिडिओ शेअर करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. परदेशात जाण्यापेक्षा गावाकडे जाऊन थोडं विसावलेलं बरं, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

शिंदेंनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

परदेशी कशाला जायाचं गड्या आपला गाव बरा शेत पिकाची दुनिया न्यारी वसे जिथे विठूरायाची पंढरी…

लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला.

यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले. तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळगावी जात असतात. याआधीही त्यांनी गावी गेल्यानंतर काही व्हिडिओ, फोटो शेअर केले होते. आताही एकनाथ शिंदेंनी एक व्हिडिओ शेअर केलाय. यात ते दरेगावच्या शेतात फेरफटका मारताना दिसत आहेत. हे ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावर टीका केली आहे. परदेशी कशाला जायाचं गड्या…. म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.