सातारा : डान्सर गौतमी पाटीलच्या नृत्यावर बंदी घालण्याची मागणी माधुरी पवार हिनं केली. माधुरी पवार म्हणाली, एका कलाकारानं दुसऱ्या कलाकारावर लांच्छन करू नये. जे काही बाहेर चाललंय त्यातून कलेचं विभत्स रूप दिसतं. एकचं नव्हे तर दोन-तीन नाव समोर आहेत. माझ्या बाबांकडून नृत्याचे धडे मिळालेत. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन शिकले. रंगमंचावरून शिकले. सातही-आठवीत असतानापासून ट्राफीज जिंकल्या. हे सर्व एका दिवसात कमविलेलं नाहीय. खूप दिवस काम केल्यानंतर माणसाच्या मनात कलाकाराच्या कलेचा रिस्पेक्ट येतो. फेमस होणं ही वेगळी गोष्ट आहे. पण, तुमच्या कलेचा रिस्पेक्ट आहे का. मी बाहेर जाते तेव्हा महिला मला विचारतात. मुलीला नृत्य शिकवायचं. पण, बाहेरचं वातावरण पाहून मुलींना नृत्याचे धडे शिकवायचे की, नाही यावर प्रश्नचिन्ह असल्याचं माधुरी पवार हिचं म्हणणंय.
माझ्याकडून एखादी चूक झाली की मी माफी मागितली. ट्रोल झाले की, तुम्ही फेमस होतात. प्रेक्षकांना त्यातलं काय आवडतं. प्रेक्षकांचं मनोरंजन वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत करण्याची इच्छा असल्याचंही माधुरी पवार यांनी सांगितलं.
समाजकारण आधीपासून आवडतं. बाईकनं फिरते. म्हतारे बाबा दिसले तर त्यांना बाईकवर बसविते. प्राण्यांसाठीसुद्धा मी काम करते. राजकारणात कधी ना कधीतरी उतरेनंच, असंही माधुरी पवार यांचं म्हणणंय.
कलाकारांसाठी जनता हा पक्ष असतो. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेचेही कार्यक्रम केले आहेत. प्रेक्षक कुठली, जनता कुठली हेच माझ्यासाठी महत्त्वाचे असल्याचंही माधुरी पवार हिनं सांगितलं. पक्षाच्याच माध्यमातून काम करेन असं नाही. गौतमी पाटील यांच्याकडून जे नृत्य केले जातात. त्या कार्यक्रमावर नक्कीचं बंदी घालावी, असं माधुरी पवार यांचं म्हणण आहे.