दुसऱ्याचे घर जळत असताना काही जणांना आनंद, स्वतःचे जळते घर वाचवण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला

या निवडणुकीचा परिणाम हा देशातील लोकसभा निवडणुकीवर होणार नाही. तसेच महाराष्ट्रावरही या निवडणुकीचा कोणताही परिणाम होणार नाही. कारण यापूर्वीचे अडीच वर्षांचे कोमात गेलेले सरकार लोकांनी पाहिलेलं आहे.

दुसऱ्याचे घर जळत असताना काही जणांना आनंद, स्वतःचे जळते घर वाचवण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 6:47 PM

सातारा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला. भाजप हा आमचा मित्रपक्ष आहे. जनमताच्या कौलाचा आदर करणारे आम्ही लोकं आहोत. एखाद्या राज्याच्या निकालावर आपण सर्व देशाचे अनुमान बांधू शकत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काही पोटनिवडणुका झाल्या होत्या. त्यात भाजपला विजय मिळला नव्हता. पण, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप हा देशात स्पष्ट बहुमत असणारा पक्ष होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. याची आठवण एकनाथ शिंदे यांनी करून दिली.

हे स्वतःची पाठ थोपाटून घेण्यासारखे

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू होती. मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड या तीन राज्याच्या निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. एखाद्या राज्याच्या निवडणुकीवरून संपू्र्ण देशावर त्याचा परिणाम होईल. असा अंदाज व्यक्त करणे म्हणजे स्वतःची पाठ थोपाटून घेण्यासारखे आहे.

हे सुद्धा वाचा

कोमात आणि जोमात हा फरक जनतेला कळतो

या निवडणुकीचा परिणाम हा देशातील लोकसभा निवडणुकीवर होणार नाही. तसेच महाराष्ट्रावरही या निवडणुकीचा कोणताही परिणाम होणार नाही. कारण यापूर्वीचे अडीच वर्षांचे कोमात गेलेले सरकार लोकांनी पाहिलेलं आहे. आमचं सरकार हे जोमात काम करत आहे. कोमात आणि जोमात हा फरक जनतेला कळतो. महाराष्ट्रातील जनतेला काम करणारे लोकं पाहिजे. घरी बसलेले लोकं आवडत नाहीत, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

अशा योजनांचा लाभ मिळेल

राज्यातील जनता सुज्ञ आहे. काम करणाऱ्या सरकारच्या पाठीशी जनता राहते. सर्वसामान्य लोकांच्या जीवनात बदल घडवणाऱ्या लोकांच्या पाठीशी जनता राहते. पुढच्या कालावधीत आम्ही दुप्पट वेगाने काम करू. शासन आपल्या दारी अशा योजनांचा लाभ आपल्याला मिळेल.

पुढच्या विधानसभा, लोकसभा निवडणुका शिवसेना-भाजप पूर्ण ताकतीने लढेल. आणि पूर्ण बहुमताने जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

काही लोकं आसुरी आनंद घेणारी

कर्नाटकात पराभव कोणाचा, विजय कोणाचा झाला, हे सर्वांना माहीत आहे. दुसऱ्याचे घर जळत असताना काही लोकं आनंद घेतात. पण, स्वतःचे घर जळते, याकडे त्याचे लक्ष नसते, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. आसुरी आनंद घेणारी काही लोकं आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.