जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतल्याने तिघांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचारादरम्यान पिता-पुत्राचा मृत्यू

सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे सर्दी खोकल्याची साथ पसरली आहे. सर्दी खोकल्यासाठी अनेक जण आयुर्वेदिक उपचारांचा अवलंब करतात. पण आयुर्वेदिक उपचार करत असताना योग्य पथ्य पाळले नाही तर काय होतं याची प्रचिती सातऱ्यात आली.

जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतल्याने तिघांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचारादरम्यान पिता-पुत्राचा मृत्यू
आयुर्वेदिक काढा प्यायल्यानंतर बाप-लेकाचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 10:37 AM

सातारा : सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात सर्दी, खोकल्याची साथ पसरते. यामुळे अनेक जण डॉक्टरांच्या औषधापेक्षा घरगुती उपायांवर भर देतात. मात्र आयुर्वेदिक औषध कधी घ्यावे आणि कोणत्या पदार्थांवर घेऊ नये याचे ज्ञान नसल्याने कधी कधी आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते. कधी कधी जीवावरही बेतते. अशीच एक घटना सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात उघडकीस आली आहे. सर्दी, खोकला होता म्हणून रात्री जेवणानंतर सर्वांनी घरगुती आयुर्वेदिक काढा प्यायला. त्यानंतर मध्यरात्री वडील, मुलगा आणि मुलीची प्रकृती बिघडली. यानंतर उपचारादरम्यान पिता-पुत्राचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी फलटण पोलिसात आकस्मित मृत्यूची घटना घडली आहे.

काय घडलं नेमकं?

हणमंतराव पोतेकर आणि अमित पोतेकर असे मयत पिता-पुत्राचे नाव आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजले नसले तरी विषबाधेमुळे हे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. पोतेकर कुटुंबीयांनी काल रविवार असल्याने दुपारी मटण खाल्ले होते. त्यानंतर रात्री पुरणपोळ्या खाल्ल्या. मग जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला आणि रात्री झोपी गेले.

मध्यरात्रीच्या सुमारास हणमंतराव, मुलगा अमित आणि त्यांची मुलगी या तिघांना त्रास होऊ लागला. त्यांना तात्काळ शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र पहाटेच्या सुमारास हनुमंतराव पोतेकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पंधरा मिनिटांनी मुलगा अमित पोतेकर याची प्राणज्योत मालवली. तर उपचारानंतर मुलीची प्रकृती स्थिर आहे.

हे सुद्धा वाचा

विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज

दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. दरम्यान, पिता-पुत्राच्या आकस्मित मृत्यूमुळे पोतेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. फलटण शहरातही पिता-पुत्राच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अमित हा पुणे येथे खाजगी बँकेत नोकरीला होता. त्याच्या लग्नाविषयी स्थळ पाहण्याचं काम सुरू होतं. वडील आठवडा बाजारात भाजीपाला धान्य विक्रीचे व्यवसाय त्यांचा होता. नॉनव्हेज, पुरणपोळी आणि आयुर्वेदिक काढा यामुळे विषबाधा झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.