Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साताऱ्यात मोठा ट्विस्ट, पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाल्यास उदयनराजेंचा पत्ता कट होणार?

सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. पण भाजपकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे महाविकास आघाडीकडून आता पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत येत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा झाली तर साताऱ्यात उमेदवारीची गणितं बदलणार आहेत.

साताऱ्यात मोठा ट्विस्ट, पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाल्यास उदयनराजेंचा पत्ता कट होणार?
खासदार उदयनराजे भोसले आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा फाईल फोटो
Follow us
| Updated on: Apr 01, 2024 | 7:27 PM

महाविकास आघाडीकडून सातारा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवण्यासाठी तयारी दाखवली आहे. त्यांची उमेदवारी नक्की झाल्यास सातारा लोकसभेची निवडणूक भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण अशी होण्याची शक्यता कमी आहे. याउलट साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध डॉ. सुरेश भोसले, किंवा डॉ. अतुल भोसले, किंवा नरेंद्र आण्णासाहेब पाटील यापैकी एक अशी होणार असल्याची शक्यता राजकीय जाणकरांनी व्यक्त केली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर महायुती किंवा भाजपाकडून कराडमधीलच उमेदवार देणे क्रमप्राप्त ठरेल, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे त्या दृष्टीने भाजप आणि महायुतीची चाचपणी सुरू झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर जनसामान्यात स्वच्छ प्रतिमा असणारा ताकदीचा उमेदवार महायुतीला किंवा भाजपला द्यावा लागणार आहे. त्या दृष्टीने कृष्णा विद्यापीठाचे कुलपती आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुरेश भोसले आणि सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले किंवा आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांची चाचपणी महायुती आणि भाजपकडून सुरू आहे.

डॉ. सुरेश भोसले कोण आहेत?

डॉक्टर सुरेश भोसले हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकारणात कार्यरत आहेत. ते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ते कृष्णा विश्वविद्यालयाचे कुलपती आहेत. सहकारातही त्यांचं मोठं योगदान आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी सहकार क्षेत्रात भरीव काम केलं आहे. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात कृष्णा हॉस्पिटलने मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण बरे करून संपूर्ण सातारा जिल्ह्यात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात अग्रेसर होते.

डॉ. अतुल भोसले कोण आहेत?

डॉ. अतुल भोसले यांना स्व सहकार महर्षी जयवंतराव भोसले यांचा मोठा राजकीय वारसा आहे. डॉ अतुल भोसले यांनी कराड दक्षिण मधून 2014 आणि 2019 अशा दोन विधानसभा निवडणूक पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात लढविल्या आहेत. पाच वर्षांपासून ते सातारा लोकसभेचे प्रभारी म्हणून प्रभावीपणे काम पाहात आहेत. गेल्या पाच वर्षांपासून भाजपाने सातारा लोकसभा मतदारसंघाची बांधणी सुरु केली आहे. लोकसभा प्रभारी म्हणून डॉ. अतुल भोसले यांची नियुक्ती केली आहे. भाजपच्या मजबुत बांधणीमुळे यशवंत विचारांचा मतदारसंघ भाजपासाठी अनुकूल झाला आहे. इथे भाजपाला यशाची खात्री आहे. लोकसभा प्रभारी म्हणून डॉ. अतुल भोसले यांनी लोकसभा उमेदवारीसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांची शिफारस केली आहे.

नरेंद्र पाटील कोण आहेत?

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांनी 2019 ची सातारा लोकसभा निवडणूक युतीकडून लढवत राष्ट्रवादीच्या उदयनराजे भोसले यांना कडवी लढत दिली होती. महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर मोठे काम केले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात माथाडी कामगार आणि मराठा समाजात त्यांचे वर्चस्व आहे. भाजपाने सातारा लोकसभेची जबाबदारी दिल्यास निवडणूक लढण्यास मी तयार असल्याचे नरेंद्र यांनी सांगितले आहे.

साताऱ्यातील लढत अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता

राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत आणल्याने भाजप आणि महायुतीला सातारा लोकसभेसाठी उमेदवारीची नव्याने मांडणी करावी लागत आहे, असल्याची चर्चा आहे. सातारा लोकसभेसाठी कराड दक्षिण, उत्तर पाटण येथूनच उमेदवार देणे क्रमप्राप्त असल्याची चर्चा आहे. डॉ. सुरेश भोसले यांचे सुसंस्कृत उच्च शिक्षित व्यक्तीमत्व स्वच्छ प्रतिमा आणि काम करण्याची पद्धत यामुळे जनसामान्यात त्यांना मोठा मान आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या तोलामोलाचे व्यक्तिमत्व असल्याने याचाच उपयोग भाजप आणि महायुती त्यांना उमेदवारी देऊन लोकसभेसाठी करून घेईल अशी शक्यता दिसते. भोसले विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण अशी लढत झाल्यास ही लढत अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.