पोलीस निरीक्षकाने युवकांना उडवले, पोलिसाच्या गाडीत होती दारूची बॉटल, मग संतप्त जमावाने…

फलटण येथे वेगळेच प्रकरण समोर आले. पोलीस निरीक्षकच रस ड्रायव्हिंग करत होते. दोन युवकांना त्याने रस ड्रायव्हिंगमध्ये उडवले. त्यानंतर तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लोकांच्या लक्षात आले.

पोलीस निरीक्षकाने युवकांना उडवले, पोलिसाच्या गाडीत होती दारूची बॉटल, मग संतप्त जमावाने...
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 4:11 PM

प्रतिनिधी, सातारा : वाहन चालवताना काही जण तारतम्य बाळगत नसतात. सुसाट वेगाने गाडी चालवतात. त्यात युवकांचा मोठ्या प्रमाणात भरणा असतो. काही तरुण तरुणपणाचा जोश ते असा काढत असतात. पण, तरुणांसह इतरही काही जण रस ड्रायव्हिंग करताना दिसून येतात. पोलीस त्यांच्यापुढे नतमस्तक होतात. अशा रस ड्रायव्हिंग करणाऱ्यांना पकडण्याची हिंमत सहसा पोलिसांत नसते. कमजोर बकरे पाहून त्यांना कापण्यात काही पोलीस धन्यता मानतात.

फलटण येथे वेगळेच प्रकरण समोर आले. पोलीस निरीक्षकच रस ड्रायव्हिंग करत होते. दोन युवकांना त्याने रस ड्रायव्हिंगमध्ये उडवले. त्यानंतर तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लोकांच्या लक्षात आले. त्यांना गाडीची तपासणी केली. तेव्हा तिथं दारूच्या बॉटल्स सापडल्या. त्यानंतर जमाव संतप्त झाला. त्यांना त्या पोलीस निरीक्षकाला चांगलेच धुतले. सध्यातरी याची तक्रार करण्यात आली नाही. पण, पोलीस निरीक्षकाची चांगलीच बदनामी झाली आहे. पोलीस विभाग त्याच्यावर काय कारवाई करते हे पाहावे लागेल.

हे सुद्धा वाचा

पोलीस निरीक्षकाची रस ड्रायव्हिंग

फलटण येथे रात्री उशिरा मद्यधुंद अवस्थेत एका पोलीस निरीक्षकाने गाडी चालवली. यात रात्री पोलिसाच्या गाडीने युवकांना उडवल्याची घटना घडली. यानंतर संतप्त जमावाने मंद्यधुंद पोलीस निरीक्षकाला चोप दिला.

रात्री साडेअकरा वाजताची घटना

पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार असे संबंधित पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. फलटण शहर पोलीस ठाण्यातून नुकतीच त्यांची बदली सातारा कंट्रोल रूम या ठिकाणी झाली होती. फलटणमध्ये येऊन दादासाहेब पवार याने रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दत्तनगर येथे मद्यधुंद अवस्थेत युवकांना उडवले.

युवकांना झाली किरकोळ दुखापत

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्याची गाडी थांबवून तपासणी केली. या गाडीमध्ये दारूची बाटली आढळून आली. संतप्त जमावाने संबंधित पोलीस अधिकाऱ्याला चांगलाच चोप दिला आहे. या अपघातातील दोन्ही युवकांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेची फलटण पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.