Gopichand Padalkar : म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा, महाविकास आघाडीबद्दल गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले…
आता म्हसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा अशी परिस्थिती या तिन्ही पक्षांची झाली आहे. त्यामुळं ते एकमेकांना अॅडजस्ट करून घेतात, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.
सांगली : म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा, अशी महाविकास आघाडी तीन पक्षांची अवस्था झाली आहे. एकमेकांना अॅडजस्ट करून घेतात. आदित्य ठाकरे यांचा दौरा म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पुरस्कृत केलेल्या कार्यकर्त्यांचा दौरा आहे, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. शिवसेनेचा दौरा आदित्य ठाकरे करतात. त्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अग्रेसर आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गळ्यामध्ये भगवा मफलर टाकतात. मग, शिवसेनेच्या (Shiv Sena) नावानं घोषणा देताहेत. उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो. आमच्यावरही बरेच वेळा हल्ला करण्यात आला. आमच्यावर हल्ला झाला तेव्हा शिवसेना, राष्ट्रवादीवाले वेगळ्या पद्धतीनं मांडणी करत होते. उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. पुण्यात खूपकाही शिवसैनिक ( Shiv Sainik) नाहीत. ते बऱ्यापैकी राष्ट्रवादीची लोकं आहेत. आदित्य ठाकरेंची सभा होते, तिथं पवारांची माणसं उपस्थित असतात, असा आरोपही पडळकर यांनी केलाय.
आता निवडणुका झाल्या तर काय होईल
आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात थोडे राष्ट्रवादी, थोडे काँग्रेस आणि उरलेसुरले शिवसेनेचे लोकं राहतात. नुकताच एक सर्वे आला. आता निवडणूक झाली तर काय होईल. त्यात त्यांनी सांगितलं की, शिवसेनेचे 18 आमदार आणि दोन-तीन खासदार निवडून येतील. आदित्य ठाकरेंचा दौरा हा जर झंझावात असेल, तर तिथं काहीतरी यायला पाहिजे होतं. परंतु, आता म्हसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा अशी परिस्थिती या तिन्ही पक्षांची झाली आहे. त्यामुळं ते एकमेकांना अॅडजस्ट करून घेतात, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.
पोलिसांचा वेळकाढूपणा
कुठलीही तक्रार आली तरी पोलीस डीसीपीकडं पाठवत नाहीत. या पोलिसांना वेळकाढूपणा करायचा आहे. काही लोकांना मदत करायची असल्यास हे पळवाटा काढतात. अरविंद देशमुख हे सरकारी वकील आहेत. जयंत पाटील यांनी माझ्याविरोधात केसेस काढायला अरविंद देशमुख यांना कामाला लावले होते. त्यामुळं देशमुख हे सरकारी वकील आहेत की, जयंत पाटलांच्या घरचे वकील आहेत. माझा अर्ज बाद करण्यासाठी हे तीन दिवस टाचा फोडत होते. दहा-बारा वकील कामाला लागले होते. तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, असा आक्षेप घेता येत नाही. अशी ही बिनडोकं लोकं सरकारी वकील म्हणून काम करतात, असा आरोपही पडळकर यांनी केलाय.