“खासदार विनायक राऊतांचे वक्तव्य एक हजार एक टक्के खोटे”; राऊतांच्या कोणत्या वक्तव्यावरून शिवसेनेने त्यांना खोटे ठरवले
अनेक निवडणुका जिंकुन शड्डू किती ताकत आहे हे दाखवले आहे आणि पुढेही तयारी असल्याचे आव्हान शंभूराज देसाई यांनी दिले आहे. पाटण बाजार समिती निवडणूक जिंकल्यानंतर शंभुराज देसाई यांनी रॉलीत शडडू ठोकून विरोधकांना आव्हान दिले होते.
सातारा : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. शिवसेना आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच नव नवे आरोपही केले जात आहे. आज पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नवा वाद रंगला आहे. खासदार विनायक राऊत यांनी शंभूराज देसाई यांच्याबाबत नवा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे की, “शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना संपर्क केला होता, त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गट आणि शिवसेना आता आमनेसामने उभा राहिले आहेत.
शंभूराज देसाई म्हणाले की, मी उद्धव ठाकरे यांना संपर्क केला हे” खासदार विनायक राऊतांचे वक्तव्य एक हजार एक टक्के खोटे आहे असुन, राऊतांना हे सिद्ध करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देत आहे.
त्यांनी पुरावा द्यावा असा इशारा त्यांनी दिला आहे. किंवा वक्तव्य मागे घ्यावे अन्यथा कायदेशीर कारवाईला समोरे जावे असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला आहे.
मंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवार यांच्याविषयी बोलतानाही त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. दादांचे आजचे पाटणमधील भाषण नैराश्यमधुन केलेले होते.
चिपळूण रस्त्याचे काम किती दिवस सुरू आहे अशी टीका अजित पवार यांनी केली होती. तसेच आता सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला नाही हे त्यांच्या भाषणामधून जाणवत होतं असा टोला त्यांनी यांना लगावला आहे.
तसेच ज्या रस्त्याने दादा गेले तो तयार करायचे काम सुरु असलेला दादानां दिसला नसावा असा उपरोधिक टोलाही अजित पवार यांना त्यांनी लगावला आहे.
अनेक निवडणुका जिंकुन शड्डू किती ताकत आहे हे दाखवले आहे आणि पुढेही तयारी असल्याचे आव्हान शंभूराज देसाई यांनी दिले आहे. पाटण बाजार समिती निवडणूक जिंकल्यानंतर शंभुराज देसाई यांनी रॉलीत शडडू ठोकुन विरोधकांना आव्हान दिले होते यावर पाटण सभेत अजित पवार यांनी देसाई यांच्यावर आपली तब्येत काय आपण करतो काय अशी उपरोधिक टीका केली होती.
तसे मुख्यमंत्र्यांना बोललं तरी हेच पुढे पुढे बोलतात यांचीच दररोज भुणभूण असते अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली होती. त्यावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, शिंदेसाहेब माझे नेते आहेत त्यांच्याबद्दल मला बोलले पाहिजे, पण संजय राऊत यांची भुणभूण अजित पवार यांना आवडते का असा प्रतिसवालही त्यांनी केला.