महिला दिनादिवशीच अल्पवयीन मुलीची प्रसूती; नंतर मुलीच्या बापाने जे केले ते काळीमा फासणारेच…

या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का त्याचीही चौकशी केली जात आहे.

महिला दिनादिवशीच अल्पवयीन मुलीची प्रसूती; नंतर मुलीच्या बापाने जे केले ते काळीमा फासणारेच...
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 11:19 PM

साताराः जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना महाराष्ट्रात मात्र एका घटनेने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात मात्र एका धक्कादायक प्रकार घडला आहे. महिला दिनादिवशीच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर ती अत्याचारग्रस्त मुलगी आठ महिने 21 दिवसांची गर्भवती राहिली होती.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्यामुळे याप्रकरणी आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपीला अटक करून पीडित अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणीसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मुलीच्या पोटात गर्भ नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी मुलीकडे चौकशी केली असता. त्या मुलीच्या वडिलांनी घरीच प्रसूती केल्याचे तिने सांगितले.

प्रसुतीनंतर जन्मलेले बाळ रडत असल्याने शेजाऱ्यांना समजायला नको म्हणून वडिलांनीच बाळाचे तोंड दाबून घरातील पारळीने त्याचे शीर धडावेगळे केले तसेच ते नाल्यांमध्ये टाकून नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती मुलीने सांगितले.

त्यानंतर या प्रकरणी याबाबत पोलिसांनी तात्काळ मुलीच्या बापावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

या घटनेची नोंद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात झाले असून अधिक तपास पोलीस उपाधीक्षक विवेक लावंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, उपनिरीक्षक दीपज्योती पाटील करीत आहेत.

पाटण तालुक्यातील या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का त्याचीही चौकशी केली जात आहे.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....