Satara Murder : साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या, आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

गावातील बस स्टँड परिसरात असलेल्या खाजगी क्लासबाहेर आरोपीने मुलीला गाठले आणि तिच्या पोटात चाकू भोसकला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ तेथे उपस्थित स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीवर हल्ला केल्यानंतर आरोपी तरुणाने विषारी औषध प्राशन केले.

Satara Murder : साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या, आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 5:04 PM

सातारा : एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला (Knife Attack) करुन युवकाने स्वतः विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीला तात्काळ साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू (Death) झाला आहे. आरोपीनेही विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची नोंद वाठार पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. निखिल राजे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Murder of a minor girl out of one sided love in Satara, attempted suicide of the accused)

एकतर्फी प्रेमातून मुलीवर हल्ला

आरोपी निखिल आणि पीडिता एकाच गावातील रहिवासी आहेत. निखिल अनेक दिवसांपासून तरुणीवर प्रेम करत होता. मात्र तरुणीकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. पीडितेचे सध्या शिक्षण सुरु असून रोज ती क्लासला जात असे. मुलगी आपल्या प्रेमाला प्रतिसाद देत नाही हे पाहून चिडलेल्या तरुणाने तिच्या येण्या-जाण्याच्या वेळेवर पाळत ठेवून आज सकाळी तिला गाठले. गावातील बस स्टँड परिसरात असलेल्या खाजगी क्लासबाहेर आरोपीने मुलीला गाठले आणि तिच्या पोटात चाकू भोसकला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ तेथे उपस्थित स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीवर हल्ला केल्यानंतर आरोपी तरुणाने विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर तो स्वतःहून कोरेगाव पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

रत्नागिरीत पेपर कठिण गेला म्हणून बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

सध्या राज्यात बारावीची परीक्षा सुरु आहे. बारावीचा इंग्रजीचा पेपर कठिण गेल्याने नैराश्येतून एका विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. वैष्णवी श्रीनाथ असे मयत विद्यार्थिनीचे नाव असून ती सामाजिक उपक्रमातही सक्रिय होती. रत्नागिरीतील संकल्पनगरमध्ये वैष्णवी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. वैष्णवीचा 4 मार्च रोजी इंग्रजीचा पेपर होता. हा पेपर कठिण गेल्याने वैष्णवी अस्वस्थ होती. वैष्णवीच्या वडिलांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते मुलासह भाजीच्या दुकानात निघून गेले. घरी आई आणि वैष्णवी दोघीच होत्या. अभ्यास करण्यासाठी खोलीत जाते असे सांगून वैष्णवी खोलीत निघून गेली. मात्र बराच वेळ झाला तरी वैष्णवी बाहेर आली नाही म्हणून आईने खोलीत जाऊन पाहिले असता वैष्णवीने गळफास घेतल्याचे दिसले. या घटनेची नोंद रत्नागिरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. (Murder of a minor girl out of one sided love in Satara, attempted suicide of the accused)

इतर बातम्या

अमरावती पोलिसांची मोठी कारवाई! धाडीत 10 किलो सोने सापडले, रोख रक्कमही जप्त

Nagpur Crime | कारने बसस्थानकावर यायच्या, बसमध्ये बसून चोरी करायच्या, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.