“ईडीच्या गैरवापराबाबत देशातील सर्व विरोधीपक्षांचे राष्ट्रपतींना निवेदन”; राष्ट्रवादीने भाजपच्या वर्मावरच घाव घातला…

कोणत्या अर्थतज्ञाला विचारून ही नोटबंदी केली ही माहिती आता पुढे येईल असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. तर महाविकास आघाडीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, काही दिवसापूर्वी काँग्रेसचे आमदार जास्त होते त्यावेळेला ते मोठे भाऊ होते तर आता राष्ट्रवादीचे मोठ्या संख्येने आमदार, खासदार आहेत.

ईडीच्या गैरवापराबाबत देशातील सर्व विरोधीपक्षांचे राष्ट्रपतींना निवेदन; राष्ट्रवादीने भाजपच्या वर्मावरच घाव घातला...
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 9:17 PM

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलवण्यात आल्यानंतर आता राष्ट्रवादीकडून राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. भाजपविरोधात जो नेता बोलत असेल, जो पक्ष भाजपविरोधी भूमिका मांडत असेल त्यांच्यावर ईडीची कारवाई करणे असे प्रकार भाजपकडून केले जात आहेत. त्यामुळे आताही जयंत पाटील यांना जी नोटीस देण्यात आली आहे. ती नोटीसही विरोधी गटातील असल्यामुळेच त्यांना देण्यात आली असल्याची टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार निशाणा साधत असताना त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावरही टीका केली आहे.

सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करताना ते म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर फडणवीस हेच दूरदृष्टीचे नेते असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यावर अनिल देशमुख यांनी सदाभाऊ खोत यांचे राजकीय ज्ञान काढत त्यांचे राजकीय ज्ञान फारच कमी असल्याचा टोला त्यांनी खोत यांना लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टीचे नेते नाहीत तर शरद पवारांसारखे दांडगे ज्ञान देशात कोणाचे नाही अशा शब्दात त्यांनी सदाभाऊ खोत यांना उत्तर दिले आहे.

विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीकडून कारवाईचा बडगा उचचला जात आहे. त्यावरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

देशातील ईडीच्या गैरवापराबाबत भारतातील सर्व विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींना निवेदन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

यावेळी अनिल देशमुख यांनी नोटांबदीवरूनही केंद्र सरकावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. नोटाबंदीने सर्व समाजाला त्रास झाला आहे. तर आता 2000 ची नोटबंदी का झाली याला सरकारकडून थातुरमातूर उत्तर दिले जात आहे.

कोणत्या अर्थतज्ञाला विचारून ही नोटबंदी केली ही माहिती आता पुढे येईल असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. तर महाविकास आघाडीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, काही दिवसापूर्वी काँग्रेसचे आमदार जास्त होते त्यावेळेला ते मोठे भाऊ होते तर आता राष्ट्रवादीचे मोठ्या संख्येने आमदार, खासदार आहेत.

त्यामुळे आता आम्ही मोठे भाऊ आहोत असे सांगत त्यांनी अजितदादांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. तर जागावाटपावरून चाललेल्या चर्चेवरून तिन्ही पक्ष एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Non Stop LIVE Update
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.