Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामराजे नाईक निंबाळकर नाराज; थेट अजित पवारांकडे तक्रार, म्हणाले भाजपकडून वारंवार…

Ramraje Naik Complaint To Ajit Pawar : रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवारांकडे तक्रार केली आहे. महायुतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अपमान केला जात आहे, असं रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, यावर अजित पवार आणि सुनील तटकरेंनी स्पष्टीकरण दिलंय. वाचा सविस्तर...

रामराजे नाईक निंबाळकर नाराज; थेट अजित पवारांकडे तक्रार, म्हणाले भाजपकडून वारंवार...
अजित पवार, रामराजे नाईक निंबाळकरImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 03, 2024 | 10:39 AM

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटात नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. भाजपकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचं रामराजे नाईक निंबाळकर म्हणालेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा सध्या सुरु आहे. काल ही यात्रा फलटणमध्ये होती. तेव्हा अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांसमोरच आपली तक्रार सांगितली.

अजित पवारांचं उत्तर

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय, अशी रामराजे यांनी तक्रार करताच अजित पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली. माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला गेला, त्यांना बोललं गेलं तर ते मी खपवून घेणार नाही. माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अपमान झाला तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंशी बोलेन, असं अजित पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीवेळीही आपण माढ्याची जागा मागितली होती. पण तोवर बराच उशीर झाला होता. म्हणून ती जागा मिळाली नाही. पण कार्यकर्त्यांचा अपमान मी खपवून घेणार नाही, असंही अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या सगळ्यावर भाष्य केलं. युती धर्माचं पालन केलं गेलं पाहिजे. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या व्हीडिओची चौकशी करा म्हणून अनेकांनी मला फोन केलेत. पण रामराजे यांचं तुतारी वाजवण्याचं विधान हे ते राजकीयदृष्ट्या बोलले आहेत. याचे दोन अर्थ आहेत, असं तटकरे म्हणाले.

रामराजे नाराज

रामराजे नाईक निंबाळकर हे मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटात नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होत आहे. आता आगामी काळात रामराजे काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

एकेकाळी विचित्र बाई ठाकरेंपुढे अगदी लोळल्या अन्...,आंधारेंची जहरी टीका
एकेकाळी विचित्र बाई ठाकरेंपुढे अगदी लोळल्या अन्...,आंधारेंची जहरी टीका.
तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण...
तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण....
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी.
लक्षवेधीवरून सभागृहात विरोधकांचा गदारोळ
लक्षवेधीवरून सभागृहात विरोधकांचा गदारोळ.
'समृद्धी'वर 1 एप्रिलपासून टोल वाढ, तुमच्या वाहनाला किती लागणार शुल्क?
'समृद्धी'वर 1 एप्रिलपासून टोल वाढ, तुमच्या वाहनाला किती लागणार शुल्क?.
क्षुल्लक कारणावरून उपसरपंचाला संपवलं; जळगाव हादरलं
क्षुल्लक कारणावरून उपसरपंचाला संपवलं; जळगाव हादरलं.
बिग बॉसचा सीझन आठवला, रोहिणी खडसेंच्या टीकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार
बिग बॉसचा सीझन आठवला, रोहिणी खडसेंच्या टीकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार.
औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा
औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा.
'...हा सरकारचा खोटानाटा खेळ', सुप्रिया सुळेंचा घणाघात
'...हा सरकारचा खोटानाटा खेळ', सुप्रिया सुळेंचा घणाघात.
सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच.. अहवालात नेमकं काय?
सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच.. अहवालात नेमकं काय?.