Satara Crime : साताऱ्यात दुसरीत शिकणाऱ्या चिमुरडीवर बलात्कार करुन खून, काही तासांत आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

संबंधित सात वर्षीय बालिका दुसरीच्या वर्गात शिकत होती. काल दुपारी साडे तीनच्या सुमारास ती बाहेर खेळायला गेली मात्र उशिरापर्यंत घराकडे परतली नाही. गिरणीतून दळण घेवून घराकडे आलेल्या आजीच्या लक्षात हा प्रकार आल्यावर घरच्यांनी शोधाशोध सुरु केली.

Satara Crime : साताऱ्यात दुसरीत शिकणाऱ्या चिमुरडीवर बलात्कार करुन खून, काही तासांत आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात
राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 5:17 PM

सातारा : दुसरीत शिकणाऱ्या सात वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना काल रात्री सातारा ढेबेवाडी विभागातील एका गावात घडली आहे. हत्येनंतर मुलीचा मृतदेह गावाशेजारील डोंगरातील दरीत आढळून आला. बलात्कार करून तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी गावातीलच एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. संतोष चंद्रु थोरात असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

बाहेर खेळायला गेलेली मुलगी परतली नाही म्हणून शोधाशोध सुरु केली

संबंधित सात वर्षीय बालिका दुसरीच्या वर्गात शिकत होती. काल दुपारी साडे तीनच्या सुमारास ती बाहेर खेळायला गेली मात्र उशिरापर्यंत घराकडे परतली नाही. गिरणीतून दळण घेवून घराकडे आलेल्या आजीच्या लक्षात हा प्रकार आल्यावर घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. मात्र सर्वत्र शोधूनही ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रात्रभर आजूबाजूच्या परिसरात कसून तपास केला.

पोलिसांना एकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता घटना उघड

चौकशी करत असताना पोलिसांना एकावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता पहाटे या प्रकरणाचा उलगडा झाला. संतोष चंद्रु थोरात असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस त्या मुलीच्या मृतदेहापर्यंत पोहचले. गावापासून लांब मृतदेह दरीत सापडला.

शंभूराजे देसाईंनी घेतली पीडित कुटुंबियांची भेट

घटनास्थळी व पिडीतीच्या कुटुंबियांची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांसह भेट दिली. घटनेची माहिती घेत तपासकामी पोलिसांना सूचना दिल्या. ही केस जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा होईल असा तपास पोलिसांकडून केला जाईल अशी माहिती शंभुराजे देसाई यांनी दिली. (Rape and murder of seven years old schoolgirl in Satara)

इतर बातम्या

Kalyan Crime: एकीला लग्नाचे वचन अन् दुसरीसोबत गाठ बांधण्याच्या तयारीत, कल्याणमधील नवरदेव गजाआड

Mumbai Crime | 12 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार, मुंबईत चर्चच्या पाद्रीला जन्मठेप

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.