Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking : प्रशिक्षणासाठी गेलेल्या साताऱ्यातील बसचा मनालीमध्ये अपघात! घाटात बसची समोरासमोर धडक

Satara Bus Accident : मंडी तालुक्यातील घाटामध्ये या बसचा अपघात झाला. बसची समोरसमोर धडक होऊन हा अपघात घडला.

Breaking : प्रशिक्षणासाठी गेलेल्या साताऱ्यातील बसचा मनालीमध्ये अपघात! घाटात बसची समोरासमोर धडक
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 9:31 AM

प्रशिक्षणासाठी गेलेल्या महाराष्ट्राच्या सातारा (Satara Bus accident) भागातील बसचा मनालीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये आठ ते दहा जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक दिली जात होती. दरम्यान, या अपघातात बसचा चालक गंभीररीत्या जखमी झालाय. मनालीच्या मंडी (Manali Bus Accident) परिसरात बसचा हा भीषण अपघात झाला. महाराष्ट्राच्या सातारा भागातून ही बस प्रशिक्षणाच्या उद्देशानं मनाली इथं गेली होती. चार आठवड्यांचं प्रशिक्षण पूर्ण करुन साताऱ्यातील ट्रेकर्स घरी परतत असताना हा अपघात झाला. साताऱ्यातील जवळपास 50 हून अधिक ट्रेकर्स या बसमधून प्रशिक्षणसाठी गेले होते. सातारा जिल्हा परिषदेच्या (Satara News) मार्फत अटल बिहारी इन्स्टिट्यूट ऑफ मॉनऊन्टेरींगच्या माध्यमातून या सर्व ट्रेकर्सचं प्रशिक्षण मनालीत आयोजित करण्यात आलं होतं. प्रशिक्षण संपवून परतत असताना त्यांच्या बसचा एका घाटामध्ये अपघात झाला. आता या अपघातामधील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यासाठी बचवकार्य केलं जातंय.

कुठे झाला अपघात?

मंडी तालुक्यातील घाटामध्ये या बसचा अपघात झाला. बसची समोरसमोर धडक होऊन हा अपघात घडला. या अपघातानंतर बसमधील सर्व ट्रेकर्स घाटात अडकल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, आता जखमींसह ट्रेकर्सला वाचवण्यासाठी आवाहन करण्यात आलंय. सातार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांशी या अपघाबाबत मदतीचं आवाहन केलंय.

थोडक्यात पण महत्त्वाचं

  1. मनाली येथे प्रशिक्षणासाठी गेलेल्या साताऱ्यातील ट्रेकर्सच्या ट्रॅव्हल बसचा अपघात
  2. अपघातात ट्रॅव्हल्स बसमधील ड्रायव्हर गंभीर जखमी
  3. हे सुद्धा वाचा
  4. प्रशिक्षणासाठी गेलेले शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि महाबळेश्वर ट्रॅक्टरचे 51 ट्रेकर्स सुखरूप
  5. दोन बसचा समोरासमोर अपघात
  6. हिमाचल प्रदेश मधील मंडी येथे अपघात

या अपघातानंतर मंडी येथील मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, आता वाहतूक पूर्ववत करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात येत असल्याची माहिती मिळतेय.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.