साताऱ्यात महाविकास आघाडीचा बोलबाला; कराडमधील ग्रामपंचायती कुणीकडे?
Satara Karad Gram Panchayat Election 2023 Result : साताऱ्यात महाविकास आघाडीचा बोलबाला पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचं साताऱ्यात वर्चस्व पाहायला मिळतंय. तर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा साताऱ्यात बोलबाला कायम आहे. कराडमधील ग्रामपंचायती कुणीकडे आहेत? वाचा सविस्तर...
सातारा | 06 नोव्हेंबर 2023 : ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल लागतो आहे. साताऱ्यात महाविकास आघाडीचा बोलबाला पाहायला मिळतोय. कराडमधील येणपे ग्रामपंचायतीमध्ये सत्ता कायम राखण्यात काँग्रेसला यश आलं आहे. ग्रामपंचायतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या उंडाळकर गटाला सत्ता राखण्यात यश आलं आहे. कराडच्या टेंभु ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे आहे. बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने बाजी मारली आहे. येवती, शेळकेवाडी ग्रामपंचायत राष्ट्रीय काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक उदयसिंह पाटील उंडाळकर यांचं पॅनेल विजयी झालं आहे.
कराडमध्ये कुणाचं वर्चस्व?
कराड कांबेरीवाडी ग्रामपंचायत आमदार बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे. कराड बानुगडेवाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे. कराड तालुक्यातील हेळगाव ग्रामपंचायतीचा निकालही समोर आला आहे. आमदार बाळासाहेब पाटील शरद पवार गट राष्ट्रवादीने जिंकली आहे. 7/3 अशा फरकाने पाटील यांचा पॅनेल विजयी झाला आहे.
कराड रेठरे बुद्रुक ग्रामपंचायत भाजपाकडे गेली आहे. भाजपाचे अतुल भोसले यांचं पॅनेल विजयी झालं आहे. सरपंच पदासह त्यांचं पॅनेल विजयी झालंय. काँग्रेससह महाविकास आघाडीच्या एकत्रित पॅनेलचा पराभव झाला आहे.
महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. तेव्हा शिवसेनेत फूट पडली. तर अजित पवार यांनी युती सरकारमध्ये सहभागी झाले. शिंदे सरकारमध्ये सध्या ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अशातच राज्यात ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. या निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीचा बोलबाला आहे. तर कराडमध्ये शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं वर्चस्व पाहायला मिळतंय.
पश्चिम महाराष्ट्रात कुणाचं वर्चस्व?
पश्चिम महाराष्ट्र हा तसा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं वर्चस्व असणारा पट्टा आहे. त्यामुळे पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात कुणाचं वर्चस्व असेल हे पाहणं महत्वाचं असेल. सांगली जिल्ह्यातल्या 84 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. 81 सरपंच पदाच्या निवडणूक देखील पार पडली होती. या सर्वांची मतमोजणी आता सुरू झाली आहे. तालुक्याच्या ठिकाणी ही मतमोजणी पार पडत असून मतमोजणीच्या ठिकाणी आता कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमू लागली आहे. ग्रामपंचायतीचा कारभार कोणाच्या हातात जाणार याकडे आता सगळ्यांची उत्सुकता लागली आहे.