साताऱ्यातील तिहेरी अपघातात एकाच गावातील 3 तरुण जागीच ठार; बुलेटचा चक्काचूर; 5 वर्षाचा मुलगा आश्चर्यकारक बचावला
सातारा-लातूर महामार्गावर (पंढरपूर) गोंदवले खुर्दजवळ आज समोरासमोर झालेल्या तिहेरी अपघातात तीन तरुण जागीच ठार झाले तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की चक्काचूर झालेली अपघातग्रस्त वाहने सुमारे तीनशे फूट अंतरापर्यंत फरपटत गेली होती.
साताराः सातारा-लातूर महामार्गावर (Satara-Latur Highway) (पंढरपूर) गोंदवले खुर्दजवळ आज समोरासमोर झालेल्या तिहेरी अपघातात तीन तरुण जागीच ठार (Three youths death on the spot) झाले तर इतर दोघे गंभीर (Two Injured) जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की चक्काचूर झालेली अपघातग्रस्त वाहने सुमारे तीनशे फूट अंतरापर्यंत फरपटत गेली होती. अपघातात सुदैवाने पाच वर्षांच्या मुलाला कसलीही इजा झाली नाही. सर्व मृत हे माण तालुक्यातील पळशी येथील असून पळशी गावावर शोककळा पसरली आहे. एकाच गावातील तीन तरुण अपघातात ठार झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. हा अपघात झाल्यानंत सातारा-लातून मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती.
तीन युवक जागीच ठार
स्विप्ट कार (एमएच 05 व्ही 9695) व बुलेट यांचा समोरासमोर अपघात झाला. या धडकेत बुलेटस्वार उंच हवेत फेकले गेले. याच दरम्यान रस्त्याने चाललेल्या क्रूझर (एमएच 13 एसी 1749) वर एक जण जाऊन आदळून रस्त्यावर फेकला गेल्याने तो जागीच ठार झाला. इतर दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये तुषार लक्ष्मण खाडे (वय 22 ),अजित विजयकुमार खाडे (वय 23), महेंद्र शंकर गौड (वय 21 सर्व रा. पळशी, ता. माण) हे तरुण जागीच ठार झाले.
वाहनांचा चक्काचूर
या अपघातात बुलेट गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. तर कारचेही मोठे नुकसान झाले. दोन्हीही वाहने सुमारे तीनशे फूट फरफटत गेल्याने रस्त्यावर वाहनांचे पुढील भाग विस्कटून पडले होते. कारमधील निवृत्त पोलीस आनंदराव ढेंबरे (वय 62) मुलगा गणेश ढेंबरे (वय 28) व विहान गणेश ढेंबरे (वय 5, सर्व रा. दीडवाघवाडी, ता. माण) हे पिंपरी (पुणे) येथून निघाले होते.
लहान मुलगा आश्चर्यकारक बचावला
या अपघातात आनंदराव व गणेश हे गंभीर जखमी झाले असून या अपघातातून विहान आश्चर्यकारक बचावला आहे. जखमींना दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, असून पोलीस पुढील तपास करत आहेत.