“देव पाण्यात ठेवले तरी निकाल न्यायमूर्तींच्या हातात”; अयोध्या दौऱ्यावरून मुख्यमंत्र्यांना काँग्रेसच्या बड्या नेत्यानं सुनावलं

अनेक देशांत ईव्हीएमवर मतदान घेणे बंद केले आहे. ईव्हीएममध्ये दोष आहे किंवा नाही हे बाजूला ठेवून आमची मागणी आहे की, लोकांचा विश्वास नसेल तर ईव्हीएम व्यवस्था थांबवली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे.

देव पाण्यात ठेवले तरी निकाल न्यायमूर्तींच्या हातात; अयोध्या दौऱ्यावरून मुख्यमंत्र्यांना काँग्रेसच्या बड्या नेत्यानं सुनावलं
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 10:33 PM

कराड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री, आमदार अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आता राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधकांनी एकनाथ शिंदे आणि आमदार, मंत्र्यांवरही त्यानी निशाणा साधला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिंदे गटावर टीका करताना बंडखोर आमदारांना त्यांनी इशारा दिला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका करताना त्यांनी न्यायालयीन निकालाचीही त्यांना त्यांनी आठवण करून दिली. अयोध्याच नव्हे तर काशी, गुहवटी ही करा , देव पाण्यात ठेवले तरी निकाल न्यायमूर्तींच्या हातात आहे असा जोरदार टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे त्यामुळे फक्त अयोध्येला नव्हे तर काशी गुवाहाटी इतर तीर्थक्षेत्र आहेत. ती सर्व केली तरी काही बिघडत नाही.

त्यामुळे हा दौरा करताा तेथील आशीर्वाद घ्यावेत आणि निकाल चांगला लागावा अशी अपेक्षा करावी असा खोचक टोलाही त्यांनी शिंदे यांना लगावला आहे.

त्या गटाने देव पाण्यात ठेवावे पण निकाल न्यायमूर्तींच्या हातात आहे असा खोचक टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ईव्हीएमच्या मुद्यालाही हात घातला आहे. ईव्हीएमचा मुद्दा हा अनेक वर्षापासून मतभेदाचा राहिला आहे.

ईव्हीएममध्ये सरकारकडून काही अप प्रकार होतोय का याबद्दल आजपर्यंत काही पुरावा मिळालेला नाही मात्र कोणत्याही निवडणूक यंत्रणेवर लोकांचा विश्वास पाहिजे मात्र लोकांचा ईव्हीएम व्यवस्थेवरून विश्वास उडाला आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी जगातील अनेक देशांत ईव्हीएमवर मतदान घेणे बंद केले आहे. ईव्हीएममध्ये दोष आहे किंवा नाही हे बाजूला ठेवून आमची मागणी आहे की, लोकांचा विश्वास नसेल तर ईव्हीएम व्यवस्था थांबवली पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, आमची विरोधी पक्षांची मागणी आहे की, ईव्हीएम ऐवजी पेपरबेस मतदान घेण्याची आग्रही मागणी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

याबाबत नरेंद्र मोदी हट्टी आहेत ते मागणी मान्य करणार नाहीत मात्र आमची मागणी ही कायम असेल अशी प्रतिक्रियाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ईव्हीएमविषयी दिली आहे.

'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.