जे मोदीवर बोलतील, त्यांच्यावरच भाष्य उलटेल…; देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

Devendra Fadnavis on Sharad Pawar and Loksabha Election 2024 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. साताऱ्यात बोलताना फडणवीसांनी शरद पवारांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत? वाचा सविस्तर.....

जे मोदीवर बोलतील, त्यांच्यावरच भाष्य उलटेल...; देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांना प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 6:52 PM

सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी साताऱ्यातील पाटणमध्ये भाजपची जाहीर सभा झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी शरद पवार यांच्या सभा होत आहेत. यावेळी शरद पवार नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करत आहेत. याला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांची छान पध्दत आहे. सगळ भाष्य करायचं अन् मग म्हणायचं भाष्य करणार नाही. पण त्यांनी करावं कारण नरेंद्र मोदीचं जीवन खुल्या पुस्तकाप्रमाणे आहे. जे मोदीवर बोलतील त्याच्यावरच भाष्य उलटेल, असं फडणवीस म्हणाले.

उदयनराजेंचा विजय निश्चित- फडणवीस

महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठीच्या पाटणच्या सभेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. उदयनराजेंचा विजय निश्चित असल्याचे म्हटलं आहे. संपूर्ण सातारा महायुती आणि उदयनराजेंच्या पाठीशी आहे. साताऱ्यात 6 पैकी 4 आमदार महायुतीचे असल्याने उदयनराजेंचा विजय निश्चित आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

यामिनी जाधव यांचा लोकसभेच्या उमेदवारीवरून आरोप करणाऱ्या विरोधकांना फडणवीसांनी इशारा दिला आहे. यामिनी जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होत असला तरी कोरोना काळातील भ्रष्टाचाराचा बोलवता धनी कोण आहे? हे लवकरच एक्सपोज करणार असल्याचा इशारा उपमुख्यम़त्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

लोकनेत्यांना पद्म पुरस्कार मिळणे साठी मी प्रयत्न करेन. मोदीजी आल्यानंतर आपण सर्व प्रकल्पांना पैसे दिलेले आहेत. शंभुराजेंनी जी जी काम दिलीत ती ती आम्ही केलेली आहेत. देश कुणाच्या हाती देश सुरक्षित असेल. जनसामान्यांचा अपेक्षा कोण पुर्ण करू शकतो. महाराजसाहेब आहेत, त्यांच्यासमोर कोण उमेदवार आहे. या निवडणुकीच्या माध्यामातून आपण करत आहोत. मोदींच्या सोबत शिवसेना , मनसे , जनसुराज्य अशा पार्टी आहेत. महायुती आपण तयार केलेलं आहे, असंही फडणवीस म्हणाले.

साताराकरांना काय आश्वास?

राहुल गांधीची यांच्यासोबत 24 पक्षांची खिचडी आहे. आपल्य़ा विकासाच्या ट्रेनचं इंजिन मोदीजी आहेत. मोदींना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा आहे. उदयनराजे यांना मत म्हणजे मोदींना मत… 140 कोटी लोकांना मोदींनी कोरोना लस मोफत दिली. कराड चिपळूण रेल्वे ची मागणी नक्की मान्य होईल, असं आश्वासनही देवेंद्र फडणवीसांनी सातारकरांना दिलं आहे.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.