Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साताऱ्याच्या पाटण तालुक्यात भीषण अपघात! दोन दुचाकी समोरासमोर भिडल्या, 3 ठार, 2 जखमी

Satara Accident News : ही धडक इतकी भीषण होती की या अपघातामध्ये समोरच्या गाडीवरील नितीन बबन तिकुडवे (वय 36) हा युवक जागेवरच ठार झाला.

साताऱ्याच्या पाटण तालुक्यात भीषण अपघात! दोन दुचाकी समोरासमोर भिडल्या, 3 ठार, 2 जखमी
साताऱ्यात भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 7:44 AM

सातारा : सातारा जिल्ह्यातील पाटण (Patan Taluka, Satara) तालुक्यात भीषण अपघात (Major Bike Accident) झाला. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू (Three Died in Accident) झाला, तर दोघे गंभीर जखमी झालेत. दोन दुचाकींची एकमेकांना समोरासमोर धडक बसून हा भीषण अपघात झाला. पाटण तालुक्यातील नवारस्ता ढेबेवाडी मार्गावर सांगवर पुलाजवळ ही दुर्घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की अपघात स्थळी अक्षरशः रक्ताचा सडाच पडलेला होता. या अपघाताची नोंद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सध्या पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. या भीषण अपघातानं रस्ते अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणलाय.

नेमका कसा झाला अपघात?

पाटण तालुक्यातील येरफळे येथील बबन धोंडीराम पडवळ (वय 65) आणि त्यांचेच पुतणे भरत रामचंद्र पाटील (वय 40) आणि अन्य एक जण, असे तिघे सेंटरिंगच्या कामानिमित्त गेले होते. आपले काम संपवून मोटार सायकल वरून परत येत असताना त्यांच्यावर काळानं घाला घातला. सांगवड येथील पुलाजवळ समोरून नवारस्ता कडून भरघाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

एक दुचाकीस्वार जागीच ठार

ही धडक इतकी भीषण होती की या अपघातामध्ये समोरच्या गाडीवरील नितीन बबन तिकुडवे (वय 36) हा युवक जागेवरच ठार झाला. तर भरत पाटील आणि बबन पडवळ यांचं उपचारादरम्यान निधन झाले. इतर आणखी दोन जण गंभीर असून त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा

अपघातातील मृतांची नावं पुढीलप्रमाणे :

  1. भरत रामचंद्र पाटील (वय 40)
  2. बबन धोंडीराम पडवळ (वय 65)
  3. नितीन बबन तिकुडवे (वय 36)

अधिक तपास सुरु

36 वर्षांचा युवक नितीन बबन तिकुडवे हा पाटण तालुक्यातील शिंदेवादी इथं राहणारा आहे. तर मृतांमधील इतर दोघे येरफळे येथील राहणार आहे. दरम्यान या घटनेची नोंद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली. सध्या या अपघातप्रकरणी अधिक तपास सहाययक पोलीस अधिकारी उत्तम भापकर करीत आहेत.

कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा.
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक.
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना.
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस...
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस....
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.