भास्कर जाधव यांच्या जहरी टीकेला शंभूराज देसाई यांचं उत्तर, म्हणाले, भास्कर जाधव यांचा प्रवास…

एखाद्या सभेत मी भास्कर जाधव यांचा प्रवास सांगेन. शिवसेना ते राष्ट्रवादी. पुन्हा राष्ट्रवादी ते शिवसेना ठाकरे.

भास्कर जाधव यांच्या जहरी टीकेला शंभूराज देसाई यांचं उत्तर, म्हणाले, भास्कर जाधव यांचा प्रवास...
शंभूराज देसाई
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 10:40 PM

सातारा : उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, नुसती टीका केली असती, तर भास्कर जाधव यांच्या वक्तव्याकडं दुर्लक्ष केलं असतं. पण, मी माध्यमात वाचलं. मी चोर आहे, अशाप्रकारचा शब्दप्रयोग त्यांनी केला आहे. आम्ही गद्दारी केल्याचंही भास्कर जाधव म्हणतात. किती दारं फिरून तुम्ही ठाकरे गटात आलाय. ठाकरे सेनेमध्ये आहात हा तुमचा कितवा पक्ष आहे, असा सवालचं शंभूराज देसाई यांनी विचारला. भास्कर जाधव सुरुवातीला शिवसेनेत होते. शिवसेना सोडताना मातोश्रीवर आमचा कसा अपमान होतो. आम्हाला भेट कशी मिळत नाही. आम्हाला किती वेळं ताटकळतं ठेवलं जातं. असं भास्कर जाधव बोलले होते.

त्यानंतर भास्कर जाधव राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीत गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या आवाजाबद्दल कुचेष्टा केली होती. ते आता तुम्ही विसरले का, असा प्रश्न शंभूराज देसाई यांनी विचारला.

ठाकरे सेनेत असल्यामुळं आमच्या ५० आमदारांबद्दल वाट्टेल ते बोलतात. व्यक्तीस्वातंत्र्य, भाषास्वातंत्र्य असल्यामुळं त्यांनी बोलावं. पण, आपण धुतल्या तांदळासारखं स्वच्छ आहोत का, हे एकदा भास्कर जाधव यांनी पाठीमागे वळून पाहावं, असा सल्लाही शंभूराज देसाई यांनी दिला.

एखाद्या सभेत मी भास्कर जाधव यांना प्रवास सांगेन. शिवसेना ते राष्ट्रवादी. पुन्हा राष्ट्रवादी ते शिवसेना ठाकरे. राष्ट्रवादीत असताना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय बोलले याचा सर्व प्रवास सांगणार असल्याचंही शंभूराज देसाई यांनी सांगितलं.

आम्हाला चोर म्हणता. पण, आताची ठाकरे सेना ही तुम्ही राष्ट्रवादीच्या मांडीवर नेऊन बसवली आहे. नागपुरातलं स्टेटमेंट पाहिलं असेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणत होते. राष्ट्रवादीची ही शिवसेना अशी टीकाही शंभूराज देसाई यांनी केली.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.