घरी फोन करुन म्हणाले भाजी घेऊन येतो, पण घरी पोहचलेच नाही, वाटेतच…

कामानिमित्त कराडमध्ये गेले होते. तेथून घरी परतत होते. त्यात पावसाचा जोर वाढला होता. यातच त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले अन् दोन मुले पोरकी झाली.

घरी फोन करुन म्हणाले भाजी घेऊन येतो, पण घरी पोहचलेच नाही, वाटेतच...
गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार विहिरीत कोसळलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 12:45 PM

कराड : कराड चिपळूण मार्गावर विहे गावच्या हद्दीत भरधाव वेगातील चारचाकी क्रुझर गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात घडला. गाडी उसाच्या शेतातून पलीकडे जाऊन 30 ते 35 फूट खोल विहिरीत गाडी कोसळली. मंगळवारी सायंकाळी ही भयंकर घटना घडली. या अपघातातील गाडी रात्री उशिरा क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली होती. परंतु, पाऊस सुरू असल्याने आणि अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते. या अपघातातील चालक बेपत्ता होता. आज सकाळी विहरीत चालकाचा मृतदेह पोलिसांना सापडला. संभाजी पवार असे गाडीतील मृत चालकाचे नाव असून ते पाटण मल्हारपेठ येथील रहिवासी आहे. चालकाशिवाय गाडीत अन्य कोणी नसल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

गाडीचे भाडे ठरवून घरी परतत होते

क्रुझर चालक संभाजी पवार हे पाटण मल्हार पेठचे रहिवाशी असून, मल्हार पेठ स्टॉपवर त्यांचा कोल्ड्रिंकचा व्यवसाय आहे. त्याचबरोबर ते टुरिस्टचाही व्यवसाय करत होते. क्रुझरसह आणखी एक गाडी त्यांनी व्यवसायासाठी विकत घेतली होती. ते काल कराडमध्ये टुरिस्ट भाडे ठरवण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी बोलणी करून ते परत कराडहून मल्हार पेठकडे निघाले असता विहे गावात त्यांनी भाजी घेतली आणि घराकडे निघाले. भाजी घेतलेल्या ठिकाणापासून अवघ्या दोन मिनिटाच्या अंतरावर गाडीवरील त्यांचा ताबा सुटला. गाडी कराड चिपळूण रोडपासून 25 फूट आत शेतात असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळली. यात संभाजी पवार यांचा बुडून मृत्यू झाला.

पहाटे विहिरीतून मृतदेह काढला

रात्री पोलिसांनी गाडी बाहेर काढली मात्र गाडी त्यांचा मृतदेह सापडला नाही. गाडीच्या काचा फुटल्याने ते पाण्यात फेकले गेले असावेत असा पोलिसांनी अंदाज बांधून विहिरीत शोध सुरू केला. पहाटे त्यांचा मृतदेह सापडला. पवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. संभाजी पवार यांच्या अपघाती मृत्यूने मल्हार पेठ गावावर शोककळा पसरली आहे.

हे सुद्धा वाचा

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.