पवित्र पोर्टलबाबत करत होते घोषणाबाजी, शिक्षण मंत्र्यांनी चांगलंच झापलं
अनुदान दिले नाही की सरकार वाईट आहे, असं बोलंलं जातं.
शंकर देवकुळे, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, सांगली : पवित्र पोर्टलमुळे शिक्षक भरतीत चांगले दर्जेदार शिक्षक मिळत नाही ते असत्य आहे. असं मत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं. पवित्र पोर्टलबाबत घोषणाबाजी करणाऱ्या शिक्षण संस्था चालकांना केसरकर यांनी चांगलंच झापलं. केसरकर म्हणाले, पाहुणा म्हणून बोलवलं आहे. त्यामुळे पाहुण्यांचा आदर करा. मागणी करा. त्यावर विचार होईल. पण तात्काळ निर्णय जाहीर करा म्हणणं बरोबर नाही. असंही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भर भाषणात सांगितलं.
अनुदान दिलं नाही तर सरकार वाईट
अनुदान दिले नाही की सरकार वाईट आहे, असं बोलंलं जातं. मुलांची शिष्यवृत्ती वाढवायची असेल तर मला विचार करावा लागतो, असंही मंत्री दीपक केसरकर म्हणाले.
सरकार आणि शिक्षणसंस्था यात कायम एक प्रकारचा संघर्ष राहिला आहे, ही वस्तुस्थिती आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळेऐवजी क्लस्टर करून त्या ठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवास खर्च देता येईल, असं त्यांनी यावेळी सूचविलं.
निर्णय घेताना विचार करावा लागतो
प्रती विद्यार्थी खर्च मर्यादित असावा लागेलच. कारण बजेटचा पण विचार करावा लागेल. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना सर्व विचार करून घ्यावा लागेल.
सरकार आणि शिक्षणसंस्था समन्वय असावा लागेलच. बजेटचा विचार करून सर्वांनी एकत्र बसून निर्णय घावे लागतील, असं दीपक केसरकार यांनी सांगितलं.
काही लोकं फक्त अनुदानासाठी शाळा काढतात
मोर्चे काढणे सरकारला दुसणे देणे बंद झाले पाहिजे. सरकार मोठ्या प्रमाणात भरती करणार आहे. काही लोकं केवळ अनुदानासाठी शाळा काढतात. काही चांगल्यासाठी शाळा काढतात, असं संस्थाचालकांना दीपक केसरकर यांनी खडसावलं.