Video : राजेंचा नादच खुळा, घातला पुन्हा कॉलरला हात सगळेच फ्लॅट, सिद्धार्थ जाधव म्हणाला…

आज राजेंनी पुन्हा कॉलर उडवली आहे. त्यांनी सातारा शहरातील एका खासगी कार्यक्रमात कॉलर उडवून त्यांच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे. या कार्यक्रमात अभिनेता सिद्धार्थ जाधव देखील उपस्थित होता.

Video : राजेंचा नादच खुळा, घातला पुन्हा कॉलरला हात सगळेच फ्लॅट, सिद्धार्थ जाधव म्हणाला...
उदयनराजे यांनी कॉलर उडवली.
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 6:36 PM

सातारा : सातारचे राजे उदयनराजे (Udayanraje) भोसले त्यांच्या हटके स्टाईने नेहमी चर्चेत असतात. उदयनराजेंची कॉलर उडवण्याची स्टाईल तर सर्वांना प्यारी. राजे कधी भरल्या सभेत स्टेजवर कॉलर (Udayanraje collar video)उडवतात. तर कधी शरद पवारांच्या (sharad Pawar) समोर. त्यांच्या बेधडक अंदाज सर्वांनाच आवडतो. आज राजेंनी पुन्हा कॉलर उडवली आहे. त्यांनी सातारा शहरातील एका खासगी कार्यक्रमात कॉलर उडवून त्यांच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे. या कार्यक्रमात अभिनेता सिद्धार्थ जाधव देखील उपस्थित होता. मात्र राजेंची ही हटके स्टाईल पाहून सिद्धार्थ जाधवही त्यांचा फॅन झाला असेल. राजे कार्यक्रमात आल्यावर बाजुच्या कार्यकर्त्यांनी त्यांना कॉलर उडवण्याची विनंती केली. त्यानंतर राजेंनीही त्यांची इच्छ पूर्ण करत कॉलरला हात घातला आणि कॉलर उडवली. उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलचे शरद पवारही फॅन आहेत. एकदा सभेत शरद पवारांनीही राजेंची कॉलर उडवली होती.

कॉलर उडवण्याची हटके स्टाईल

आपली डायलॉगबाजी, कॉलर उडवण्याची स्टाईल आदींमुळे उदयनराजे कार्यकर्त्यांमध्ये प्रिय आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ चित्रपटाची भुरळ उदयनराजेंना पडल्याचं पाहायला मिळालं. कारण राजे त्यावेळी थेट लुंगीत दिसून आले. त्यानंतर गाडीत बसले असताना तिथे पुष्पा चित्रपटातील गाणं सुरु होतं. या गाण्यावर ठेका धरत उदयनराजे यांनी कॉलरही उडवली. खासदार उदयनराजे भोसले यांनी पुष्पा : द राईज  हा चित्रपट साताऱ्याच्या राजलक्ष्मी थिएटरमध्ये जाऊन पाहिला. उदयनराजे भोसले यांच्यासोबत काही मित्र आणि कार्यकर्ते देखील चित्रपट पाहण्यासाठी पोहोचले होते. पुष्पा चित्रपट खासदार उदयनराजे भोसले यांना आवडला असल्यानं सातारकरांमध्ये या सिनेमाची चर्चा आहे.

राजेंचे अनेक व्हिडिओ व्हायरल

एकदा उदयनराजेंच्या एका चाहत्याने आपल्या ओपन ऑडी कार मधून फेरफटका मारण्याची राजेंना विनंती केली. मग काय? विनंतीला मान देऊन राजेंनी ऑडी कारमध्ये स्वार होत सातारा शहरामधून अर्धा तास फेरफटका मारला. चाहत्यांनी त्यांचा Video रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. राजेंचे बाईकवर किंवा जिप्सीत फेटफाटाका मारण्याचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत असतात. कधी कधी राजे भरल्या सभेत स्टेजवर गाणेही गातात. ‘काय बाई सांगू, कसं गं सांगू, मलाच माझी वाटे लाज’, हे गाणं भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी एका व्यासपीठावर गायलं. सातारा नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाच्या वेळी उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्र राजेंना चर्चेला येण्याचं ओपन चॅलेंज दिलं होतं. तेव्हा उदयनराजेंनी गाणं गायल्यानंतर एकच हशा पिकला होता. आता पुन्हा कॉलर उडवल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

उत्पल पर्रिकरांना वगळून भाजपनं ज्यांना तिकीट दिलं, त्यांनीच एकेकाळी पणजी पोलिस स्थानकावर हल्ला केला होता!

कुत्र्या-मांजरांची गणना होते, मग ओबीसींची जनगणना का होत नाही?; जितेंद्र आव्हाड भडकले

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.