Video : ‘आम्ही विकासाचा नारळ फोडला, पण तुम्ही तर…’, शिवेंद्रराजेंच्या टिकेला उदयनराजेंचं प्रत्त्युत्तर
साताऱ्या(Satara)त सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवेंद्रराजें(Shivendra Raje Bhosale)च्या टिकेला उदयनराजें(Udayanraje Bhosale)नी सडेतोड उत्तर देत टीका केलीय.
सातारा : साताऱ्या(Satara)त सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवेंद्रराजें(Shivendra Raje Bhosale)च्या टिकेला उदयनराजें(Udayanraje Bhosale)नी सडेतोड उत्तर देत टीका केलीय. शिवेंद्रराजेंनी काही दिवसांपूर्वी उदयनराजेंवर टीका केली होती. उदयनराजेंची गँग म्हणजे नारळफोड्या गँग असा उल्लेख केला होता. यामुळे नाराज झालेल्या खासदार उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना फटकारलं. आम्ही नारळ वाढवून लोकांची चांगली कामं करतो मात्र तुम्ही तर लोकांची घरच फोडायचं काम केल्याची जहरी टीका करत शिवेंद्रराजेंना प्रत्त्युत्तर उत्तर दिलं.
‘विश्वासानं तुमच्या बँकेत पैसे ठेवले, पण…’ उदयनराजे म्हणाले, की जिल्ह्यातील लोकांनी विश्वास ठेवत तुमच्या बँकांमध्ये पैसे ठेवले. मात्र त्यांना फसवत तुम्ही त्यांचीच घरं फोडायची कामं केली. त्यामुळे लोकांची घरं फोडण्यापेक्षा आमची नारळ फोडुन लोकांची विकास कामं करणारी गँग चांगली, असा निशाणा शिवेंद्रराजेंवर साधला.
‘बुद्धी लहान होत चाललीय’ ते पुढे म्हणाले, की वय वाढल्यामुळे शिवेंद्रराजेंची बुद्धी लहान मुलाच्या बुद्धीपेक्षा कमी झालीय. त्यामुळेच त्यांनी आमच्यावर असा आरोप केलाय. वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करणं हे माझ्या लेवलचं मी समजत नाही, मात्र अत्यंत संकुचित वृत्तीचे हे लोक आहेत. आरोप करताना त्यांनी विचार करायला पाहिजे, असा घणाघात त्यांनी केला.
‘कॉम्पिटिशन हेल्दी पाहिजे’ लोकांची आमच्याकडुनच कामांची अपेक्षा आहे. त्यामुळेच आम्ही कामांचे नारळ फोडतो. हेल्दी कॉम्पिटिशन पाहिजे, ती त्यांनी जरूर करावी, मात्र असे आरोप करताना थोडं भान ठेवलं पाहिजे, असा टेलादेखील त्यांनी यावेळी शिवेंद्रराजेंना लगावला. दरम्यान, मागील काही दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. जिल्हा बँक निवडणुकीतही साताऱ्यातील स्थानिकांना याचा अनुभव आला होता. आता पुन्हा शिवेंद्रराजेंच्या आरोपांना उदयनराजेंनी प्रत्त्युत्तर दिल्यानं हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.