Sharad Pawar : या गद्दारांचं आता करायचं काय? भाषण सुरू असतानाच चिठ्ठीतून सवाल, शरद पवारांनी भरसभेत हा आदेश दिला

Sharad Pawar on Traitors : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या घडामोडी घडल्या. दोन अडीच वर्षांपूर्वी शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अजितदादा समर्थकांसह महायुतीच्या खेम्यात दाखल झाले. त्यानंतर गद्दार हा परवलीचा शब्द झाला. वाईच्या सभेत पवारांनी याप्रकरणी स्पष्ट भूमिका घेतल्याचे समोर आले...

Sharad Pawar : या गद्दारांचं आता करायचं काय? भाषण सुरू असतानाच चिठ्ठीतून सवाल, शरद पवारांनी भरसभेत हा आदेश दिला
शरद पवारांचा गद्दारांना थेट इशारा
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 4:00 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या घडामोडी घडल्या. 2019 पासूनच राज्याच्या राजकारणाने वेगळ्या वाटेवर प्रवास सुरू केला. जिवलग मित्र एकमेकांचे शत्रू झाले. तर दोन-अडीच वर्षांपूर्वी राज्यातील दोन मोठ्या पक्षांना फुटीचा फटका बसला. शिवसेना दुभंगली. तर अजित पवार समर्थकांसह महायुतीच्या खेम्यात दाखल झाले. राष्ट्रवादीत उभी फूट पडली. राजकारणात गद्दार हा परवलीचा शब्द झाला. या गद्दारांचं करायचं काय असा सवाल भरसभेत शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर पवारांनी थेट असा आदेश दिला.

राजकारणा वेगळ्याच वळणावर

2019 मध्ये शिवसेना आणि भाजपात फाटलं. त्यानंतर पहाटेचा भाजप-राष्ट्रवादीचा शपथविधी झाला काय, अवघ्या काही तासाचं सरकार आलं काय, राष्ट्रपती राजवट लागली काय आणि नंतर धक्कातंत्र देत महाविकास आघाडीचं सरकार राज्यात सत्तेवर आलं काय, या घडामोडी वेगानं घडल्या. त्यानंतरही राज्यातील धक्कातंत्र कमी झाले नाही. राजकारणात हादरे नाही तर भूकंप आले. शिवसेनेत पहिला सुरूंग लावण्यात भाजपाला मोठं यश आले. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने विश्वासू शिलेदार महायुतीच्या गोटात आला. महाविकास आघाडीचे सरकार गडगडले आणि महायुतीचे सरकार आले. त्यानंतर ऑपरेशन लोट्सचा प्रयोग राष्ट्रवादीवर झाल्याचा आरोप करण्यात आला. राष्ट्रवादीत उभी फूट पडली. या दोन घटनेनंतर राज्याच्या राजकारणात, पन्नास खोके एकदम ओके, गद्दार हे परवलीचे शब्द झाले. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा राग दिसून आला. गद्दारांना धडा शिकवण्याची भाषा विधानसभेच्या प्रचारादरम्यान वारंवार झाली.

हे सुद्धा वाचा

वाईत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी

योगायोग म्हणजे वाईमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला आहे. सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघापैकी वाई हा एक विधानसभा मतदारसंघ आहे. वाई मतदारसंघात शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट आमने-सामने आहे. या मतदारसंघात महायुतीमधील राष्ट्रवादीकडून आमदार मकरंद पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीकडून अरुणादेवी पिसाळ या उमेदवार आहेत.

शरद पवारांनी काय दिला आदेश

सातारा जिल्ह्यातील वाई मतदारसंघात शरद पवार यांची प्रचार सभा आज झाली. या प्रचार सभेत शरद पवार हे मार्गदर्शन करत होते. त्यावेळी त्यांच्याकडे एक चिठ्ठी आली. पवारांनी ही चिठ्ठी वाचून दाखवली. त्यात आता गद्दारांचं काय? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवारांनी काय करायचं गद्दारांचं असा प्रश्न विचारला आणि लागलीच पाडा पाडा पाडा, असे वक्तव्य केले.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.