Shahaji Patil : जे संजय राऊतांचं झालं तेच अमोल मिटकरींचं होणार, शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?

शिवसेना ही राष्ट्रवादी पक्षाने अडचणीत आणली. आमची नैसर्गिक युती ही अडीच वर्षांपूर्वीच मार्गी लागायला हवी होती. मात्र तसे झाले नाही, याला जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस आहे.

Shahaji Patil : जे संजय राऊतांचं झालं तेच अमोल मिटकरींचं होणार, शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?
शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 9:37 PM

सातारा : माण तालुक्यातील म्हसवड जवळच्या विरकरवाडी येथे किसन विरकर यांच्या स्मरणार्थ ओपन भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले. या बैलगाडी शर्यतीच्या बक्षीस वितरण समारंभाला सांगोला विधानसभेचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Patil) आणि माण – खटावचे आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) हे उपस्थित होते. बैलगाडीवरील शर्यतीवर शासनाने बंदी उठवली. त्यानंतर प्रथमच या भागात मोठ्या स्वरूपात बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले. माण तालुक्यासह दुष्काळी भागातूनही (Drought Region) मोठ्या स्वरूपात सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून स्पर्धक दाखल झाले. यावेळी बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले, अमोल मिटकरी हे राजकारणात नवे आहेत. सद्या मिटकरी यांनी संजय राऊत यांना गुरू मानले आहे. जे संजय राऊतचे झाले तेच मिटकरींचे पण एक दिवस होणार. आमच्या सारख्या लोकांची एखादी गोष्ट चुकली तरी चालेल. पण पक्षाचा एखादा प्रवक्ता कागद हातात मिळाल्यानंतर काहीही बडबड करत असेल तर हे चुकीचं आहे. शरद पवार यांनी चुकीची केलेली निवड म्हणजे अमोल मिटकरी, असा घणाघात त्यांनी केला.

कटापूर योजना अंतिम टप्प्यात

आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले, माण तालुक्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात एवढी बैलगाडी शर्यत भरवण्यात आली. याच्या बक्षिसाच्या रक्कम देखील मोठी आहे. शासनाने या पुढील काळात या शर्यती बंद करू नयेत. या भागात शर्यती वाढत जाव्यात. हे शेतकऱ्याचे पशुधन आहे. शेतकरी हा बैलाकडे देवाच्या रूपात पाहतो. कटापूर योजना ही अंतिम टप्प्यात आहे. याबाबत त्याचा प्रश्न चार महिन्यांत मार्गी लागेल, मी असं बोललो असलो तरी जयकुमार गोरे यांनी याचा कालखंड पन्नास दिवसांचा केला. या योजनेचा फायदा मान तालुक्यासह आटपाडी सांगोला तालुक्याला देखील होणार आहे.

शिवसेनेला राष्ट्रवादीनेच अडचणीत आणल्याची टीका

भाजपने वेगळं राजकारण करून शिवसेना फोडली. या जयंत पाटलांच्या विधानावर बोलताना त्यांना कोणताही नैतिक अधिकार याविषयी बोलण्याचा त्यांना नाही. शिवसेना ही राष्ट्रवादी पक्षाने अडचणीत आणली. आमची नैसर्गिक युती ही अडीच वर्षांपूर्वीच मार्गी लागायला हवी होती. मात्र तसे झाले नाही, याला जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण शिवसेना संपवण्याचा प्लान होता. मात्र एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना वाचवली. याचा जळफळाट जयंत पाटील यांना होतोय. “काय होता तो दुष्काळी भाग”….. काय झालाय तो आता आमचा दुष्काळी भाग…. काय होणार आता हिरवागार भाग … दुसरं काश्मीर म्हणजे आमचं माण खोर.

हे सुद्धा वाचा

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.