सत्यजित तांबे आमदार होताच वडिलांनी दिला मोलाचा सल्ला, सत्यजित तांबे कोणत्या पक्षाशी हात मिळवणी करणार?

सत्यजित तांबे यांचा विजय झाल्यानंतर त्यांचे वडील माजी आमदार सुधीर तांबे यांनी सत्यजित तांबे यांना सल्ला दिला आहे. त्यानंतर सत्यजित तांबे हे 4 फेब्रुवारीला भूमिका मांडणार आहे.

सत्यजित तांबे आमदार होताच वडिलांनी दिला मोलाचा सल्ला, सत्यजित तांबे कोणत्या पक्षाशी हात मिळवणी करणार?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 8:42 AM

नाशिक : नाशिक विधानसभेच्या निवडणुकीत सत्यजित तांबे ( Satyajit Tambe )यांनी बाजी मारली आहे. यानंतर सत्यजित तांबे यांना भाजपकडून ( BJP ) पक्षात येणाच्या ऑफरही दिल्या जात आहे. तर दुसरिकडे कॉंग्रेसकडून ( Congress ) सत्यजित तांबे यांना पक्षात पुन्हा घेण्याच्या संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहे. त्यामुळे सत्यजित तांबे कोणत्या पक्षासोबत हातमिळवणी करणार अशी चर्चा सुर झाली आहे. अशातच सत्यजित तांबे यांचे वडील माजी आमदार सुधीर तांबे ( Sudhir Tambe ) यांनी सतयजित तांबे यांना मोलाचा सल्ला दिला आहे. सुधीर तांबे म्हणाले, सत्यजित माझ्या मित्रासारखा आहे, याबाबत आमच्यात चर्चा झाली नाही, चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करू पण माझा सल्ला अपक्ष राहण्याचाच असेल असेही सुधीर तांबे यांनी म्हंटलं आहे.

सुधीर तांबे म्हणाले, सत्यजित हा युवा नेता आहे. काम करण्याची त्याही क्षमता आहे. आमदार म्हणून तो मतदार संघातील कामे सोडविण्याचे काम करेल याची खात्री आहे.

सत्यजित तांबे यांच्या कामाची पद्धत आणि जिद्द पाहून इतर पक्षांना वाटत असेल की त्यांनी आपल्या पक्षात यावे, पण तसा कुठलाही निर्णय अजून झाला नाही असेही तांबे यांनी म्हंटलं आहे.

हे सुद्धा वाचा

याशिवाय सुधीर तांबे यांनी माझीही सुरुवात अपक्ष म्हणूनच झाली होती, 13 वर्षे मी आमदार होतो, लोकांच्या सतत संपर्कात होती, त्यांच्याशी नाळ घट्ट जुळली आहे, त्यामुळे यापुढेही तसेच राहील असेही सुधीर तांबे म्हणाले आहे.

दरम्यान, सत्यजित तांबे हे निवडणुकीच्या रिंगणात आले तेव्हापासूनच त्यांच्या भाजपासोबत जवळीक असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहे. यामध्ये त्यांना स्थानिक पातळीवर पाठिंबा असल्याचं सांगत भाजपची साथ असल्याचे जाहीर झाले होते.

सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सर्वपक्षांना पाठिंबा मागू असे विधान केले होते, त्यानंतर मात्र तांबे यांनी कुठलाही उघड पाठिंबा मागितला नाही, त्यामुळे सत्यजित तांबे यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा सुरू झाली होती.

तर दुसरींकडे कॉंग्रेसकडून सत्यजित तांबे यांची मनधरणी करण्यासाठी निलंबन मागे घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहे. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील यांनीही पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे.

4 फेब्रुवारीला सत्यजित तांबे हे आपली भूमिका मांडणार आहे. निवडणूक काळात योग्य वेळ आल्यावर बोलेल म्हणत सत्यजित तांबे यांनी मौन बाळगलं होतं, त्यामुळे सत्यजित तांबे वाडिलांचा सल्ला ऐकतात की कुण्या पक्षाची वाट धरतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.