सावरकरांच्या स्वातंत्र्याचे समर, त्यांच्या आठवणी आपल्या सोबत घेऊन तरुणांनी महाराष्ट्र गाठला.
सेल्यूलर जेलसमोर हातात तिरंगा घेत तरुणांनी सावरकरांच्या कविता म्हटल्या. गाणी गायिली.
कार्यक्रमाला अभिनेते शरद पोंक्षे, डॉ. सत्चिदानंद शेवडे, पार्थ बावस्कर यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्रातील तरुणांनी सेल्यूलर जेलला भेट दिली. सावरकरांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन केले.
सेल्यूलर येथे भेट दिल्यानंतर महाराष्ट्र मंडळात व्याख्यानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
नाशिकसह राज्यभरातून दोनशेच्यावर सावरकर प्रेमींनी अंदमानला भेट देत एक कार्यक्रम केला.