“अजूनही सावित्रींच्या लेकींचा संघर्ष सुरूच”; रुपाली चाकरणकर यांनी ‘तिच्या’ दुःखाची कारणच सांगितली…
सोशल मीडियावरील उर्फी जावेद अभिनेत्रीच्या फोटोवरून चित्रा वाघ यांनी तिचे थोबाड रंगवण्याची भाषा केली आहे. त्यावर रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रात राज्यात कायद्याचे राज्य आहे.
नायगावः सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नायगाव येथील शाळेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी समाजातील व्यक्ती बदलल्या पण प्रवृत्ती तशाच राहिल्या असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. समाजातील व्यक्ती बदलल्या असल्या तरी समाजातील प्रवृत्ती कायमस्वरूपी त्याच राहिल्या असल्याने आजच्या काळातही सावित्रींच्या लेकींचा संघर्ष सुरूच असल्याची भावनाही रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली.
सावित्रीबाई फुले यांच्या 175 वर्षांचा इतिहास पाहता, सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अनिष्ठ आणि कर्मठ शक्तींविरोधात लढत त्यांनी सावित्रींच्या लेकींसाठी ज्ञानाची कवाडे खुली केली आहेत.
तरीही आजच्या काळात व्यक्ती बदलल्या आहेत, मात्र प्रवृत्ती त्याच राहिल्या आहेत, त्यामुळे सावित्रींच्या लेकींचा हा संघर्ष सुरूच असल्याचेही त्यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले यांची जयंती होत असतानाच राज्यात अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांचाही वाद शिगेला पोहचला आहे.
सोशल मीडियावरील उर्फी जावेद अभिनेत्रीच्या फोटोवरून चित्रा वाघ यांनी तिचे थोबाड रंगवण्याची भाषा केली आहे. त्यावर रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रात राज्यात कायद्याचे राज्य आहे.
प्रत्येक ठिकाणी एक व्यवस्था काम करत असते. त्यामुळे कोणीही थोबाड रंगवण्याची आणि कायदा हातात घेण्याची भाषा करू नये असंही रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
समाजातील कोणत्याही व्यक्तीवर अन्याय, अत्याचार झाला असेल तर तुम्ही कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करू शकता मात्र कोणालाही कायदा हातात घेण्याची गरज नाही असं म्हणत त्यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे.
अभिनेत्री उर्फी जावेद असेल किंवा इतर गोष्टी असतील त्यांनी जर समाजातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर कारवाई ही केलीच जाईल.
मात्र त्याच वेळी उर्फी जावेद हिच्या जीविताला धोका निर्माण करायचा कोणी प्रयत्न केला जात असेल तर त्याला सुरक्षा व्यवस्था पोहचवण्याचं कामही कायदा सुव्यवस्था करत असते असंही त्यांना यावेळी सांगितले.