सावित्रीबाईंनी महाराष्ट्राचे वैचारिक पुढारलेपण केले; शिक्षण मोफत देण्याची पहिली मागणी त्यांचीच, काय म्हणाले फडणवीस?
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एका आयुष्यात एका व्यक्तीने किती संघर्ष करावा, समाजाला दिशा देण्याचे किती काम करावे. विधवा मुलांचे संगोपन, पुनर्विवाह, सर्वांपर्यंत शिक्षण, भारतीयांनी सुरू केलेली पहिली मुलींची शाळा, दलित मुलांची पहिली शाळा, पहिले वाचनालय अशी अनेक कामे फुले दाम्पत्यांनी केली.
पुणेः सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांनी महाराष्ट्राचे (Maharashtra) वैचारिक पुढारलेपण केले. देशात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्याची पहिली मागणी त्यांनीच केली, असे प्रतिपादन सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. फडणवीस यांनी ऑनलाईन हजेरी लावली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाईंचा पुतळा होणे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या कार्यक्रमाला बोलावले त्याबद्दल संपूर्ण समितीचे आभार. अतिशय चांगल्या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी त्यानिमित्त मिळाली आहे. आज शिक्षणाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रात महिला सक्षमपणे वाटचाल करत आहेत. याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते. भारतीय समाज नेहमी त्यांचा आभारी राहील. महाराष्ट्राचे वैचारिक पुढारलेपण ज्या थोर महापुरुषांमुळे आहे, त्यात सावित्रीबाईंचा उल्लेख आवर्जुन करावा लागतो.
कृतीशील समजसुधारक
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रत्येक पुरुषाच्या यशात स्त्रीचा वाटा असतो. याचे आद्य उदारहण सावित्रीबाई फुले यांचे आहे. अर्थातच स्त्रीच्या पाठिशी पुरुषही भक्कमपणे उभा राहतो. याचे श्रेय ज्योतिबांना द्यावे लागेल. ज्योतिबांच्या कामाला सावित्रीबाईंनी सामाजिक साथ दिली. त्या स्वतःही कृतीशील समजसुधारक, दृष्ट्या शिक्षणतज्ज्ञ होत्या. ज्योतिराव गेल्यांनंतर त्यांनी त्यांच्या अनुयायांचे नेतृत्व केले. ज्योतिरावांनी उभ्या देशाला संघर्ष शिकवला. त्यामुळे बाबासाहेबांनी फुल्यांना गुरुस्थानी मानले.
शिक्षणासोबत न्याय येतो…
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संस्कारयुक्त शिक्षण आले की न्याय आणि सत्य येते. आजकाल नवीन शिकण्याची इच्छा नसते. अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची पाळी आली तर थांबू नये. सावित्रीबाईंनी अपमान, अवहेलना सोसूनही शांतपणे संघर्ष केला. त्यांच्यामुळे अनेकांच्या जीवनात आनंद आला. एका आयुष्यात एका व्यक्तीने किती संघर्ष करावा, समाजाला दिशा देण्याचे किती काम करावे. विधवा मुलांचे संगोपन, पुनर्विवाह, सर्वांपर्यंत शिक्षण, भारतीयांनी सुरू केलेली पहिली मुलींची शाळा, दलित मुलांची पहिली शाळा, पहिले वाचनालय अशी अनेक कामे फुले दाम्पत्यांनी केली.
समाजउत्थानाचा मार्ग…
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करावे, ही देशाचे पहिली मागणी 1882 मध्ये हंटर कमिशनकडे ज्योतिबांनी केली. त्यात सावित्रीबाईंचा उल्लेख केला. त्यांनी अर्धा शतक समाज कार्यासाठी वाहून घेतले. दुष्काळ छावणी, विधवा केशवपन, नाभिक संपात त्या नेत्या होत्या. त्यांनी सक्षम समाज घडवला. सत्यशोधक चळवळीचेही नेतृत्व केले. 1893 मध्ये सासवड सत्यशोधक परिषेचे अद्यक्षपद भूषविले. आपल्या विचारांचा प्रचार साहित्यातून केला. समाज व्यसनाधीन होऊन नये म्हणे शिक्षण घ्या. अंधश्रद्दा पाळू नका. धर्माचे अवडंबर माजवू नका, असे आवाहन केले. रुढीवादी प्रथा संपवण्यासाठी योगदान दिले. खऱ्या अर्थाने समाजउत्थानाचा मार्ग दाखवला. त्यावरून आपण चालत राहू, असे आवाहन त्यांनी केले.
इतर बातम्याः