पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंदच, महापौरांची घोषणा

महानगरपालिका हद्दीत कोरोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग 14 मार्च 2021 पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंदच, महापौरांची घोषणा
मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 1:30 PM

पुणे : महानगरपालिका हद्दीत कोरोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग 14 मार्च 2021 पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. (School College Pune Closed 14 March Mayor murlidhar Mohol)

शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असले तरी या काळात ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल, अशी माहितीही महापौर मोहोळ यांनी दिली आहे.

रात्री 11 ते सकाळी 6 संचाराचे निर्बंध कायम

रात्री 11 ते सकाळी 6 संचाराचे निर्बंध कायम असणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत पुणे महानगरपालिका हद्दीत संचार निर्बंध कायम ठेवण्यात आले असून अत्यावश्यक सेवा, शिफ्ट मध्ये कामकाज करणाऱ्यांना यात मुभा देण्यात येत आहे. तर अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई सुरु राहणार आहे.

तीन ठिकाणी कोव्हिड सेंटर

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. काल तर एकाच दिवशी जवळपास कोरोनाचे सातशे रुग्ण आढळून आले. यानंतर महापालिका अगदी अलर्ट झाली आहे. रक्षक नगर, गणेश कला क्रीडा मंडळ, पठारे स्टेडियम या तीन ठिकाणी महापालिका कोव्हिड सेंटर सुरू करणार आहे.

रक्षक नगर, गणेश कला क्रीडा मंडळ, पठारे स्टेडियम या तिन्ही सेंटरवर 500 बेड्स उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णांना बेड्स मिळणं सुलभ होणार आहे. येत्या दोन दिवसांत हे सेंटर पुन्हा सुरु करणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी दिली आहे.

गरज पडल्यास पुन्हा जंबो कोव्हिड सेंटर सुरु करणार

तसंच गरज पडल्यास पुन्हा जम्बो कोविड सेंटरही सुरू करणार असल्याची माहिती अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी दिली आहे. एकंदरितच कोरोनाला आळा प्रतिबंध घालण्यासाठी पुणे महापालिका अॅक्शन मोडमध्ये आहे.

खासगी रुग्णालयातील 50 टक्के बेड राखीव

पुणे महापालिकेनं खासगी रुग्णालयांना बेडसंदर्भात सूचना देताना शहरातील 50 टक्के बेड राखीव ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. खाजगी रुग्णालय प्रमुखांशी झालेल्या बैठकीत पालिका आयुक्तांनी शहारातील रुग्णालयांना अश्या प्रकारच्या सूचना दिल्या आहेत.

(School College Pune Closed 14 March Mayor murlidhar Mohol)

हे ही वाचा :

पुण्यात पुन्हा कोव्हिड सेंटर सुरु, 50 टक्के खासगी बेड राखीव, कोरोना थोपवण्यासाठी प्रशासनाने हात आखडले

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.