School Reopen | शाळा उघडण्याचा मुहूर्त ठरला, नववी-बारावीचे वर्ग जुलैपासून
शालेय शिक्षण विभागाच्या नवीन निर्णयानुसार नववी, दहावी आणि बारावीची प्रत्यक्षात शाळा आणि त्यांचे वर्ग जुलै महिन्यापासून सुरु केली जाणार आहेत.
मुंबई : राज्यात कोरोना आणि त्याच्या प्रादुर्भावाने (School Reopen In Maharashtra) धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत सोमवारपासून (15 जून) ऑनलाईन शाळा सुरु केल्या जाणार आहेत. मात्र, त्याला कडाडून विरोध सुरु होत असतानाच आज शालेय शिक्षण विभागाने शाळा जुलै महिन्यात सुरु करण्याचा निर्णय घेतला असून यासाठीचे वेळापत्रक जाहीर (School Reopen In Maharashtra) केले आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या नवीन निर्णयानुसार नववी, दहावी आणि बारावीची प्रत्यक्षात शाळा आणि त्यांचे वर्ग जुलै महिन्यापासून सुरु केली जाणार आहेत. तर या वेळापत्रकानुसार, पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळांची सुरुवात सप्टेंबर महिन्यापासून होणार आहे. तर सहावी ते आठवीचे वर्ग हे ऑगस्टपासून भरवले जाणार आहेत. दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रत्यक्ष वर्गाचा निर्णय घेतला जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयात पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करु नये, असं स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
शालेय शिक्षण विभागाने आज जाहीर केलेले हे वेळापत्रक संभाव्य स्वरुपाचे असून स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरु करण्याचे नियोजन करण्यात यावे, तसेच आवश्यकतेनुसार नवीन प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने किंवा शाळेत गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेऊन करण्यात यावी, असेही या आदेशात म्हटलं आहे (School Reopen In Maharashtra).
दुसरीकडे, डिजीटल शिक्षणासंदर्भात हा आदेश म्हणतो की, विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा विचार करुन घरी राहून डिजीटल पद्धतीने अभ्यास हा वेळेच्या मर्यादितच केला जावा, असंही सागण्यात आलं होतं. त्यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी आणि इयत्ता पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करु नये,असे स्पष्ट पणे सांगण्यात आले आहे.
इयत्ता तीसरी ते पाचवीसाठी कमाल एक तास प्रतिदिन इयत्ता सहावी ते आठवीसाठी कमाल दोन तास प्रतिदिन, इयत्ता नववी ते बारावीसाठी कमाल तीन तास प्रतिदिन असे नियोजन करण्यात येण्याची यावेत असेही या आदेशात म्हटले आहे.तसेच डिजिटल अध्ययनात आवश्यकतेनुसार मोकळा वेळ म्हणजेच ब्रेक देण्यात यावा आणि विद्यार्थ्यांचे सलग अध्ययन करुन घेण्यात येऊ नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अशा होतील प्रत्यक्षात शाळा सुरु
- जुलै – नववी, दहावी, बारावी
- ऑगस्ट – सहावी ते आठवीपर्यंत
- सप्टेंबर – पहिली ते पाचवी
- अकरावी, दहावीच्या निकालावर आधारित असेल
- पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण नाही
- डिजीटल शिक्षणाची मर्यादा एक ते दोन तासांवर आणली
लाॅकडाऊनमध्ये परीक्षा घेणाऱ्या तळेगावातील महाविद्यालयावर प्रशासनाची मोठी कारवाईhttps://t.co/3Cnu44ZNuP#Exams2020 #PuneLockdown #Lockdown5
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2020
School Reopen In Maharashtra
संबंधित बातम्या :
नागपुरातील शाळांकडून पालकांना फी भरण्यास; पुस्तक खरेदीसाठी सक्ती, पालकांकडून आंदोलनाचा इशारा
लाॅकडाऊनमध्ये परीक्षा घेणाऱ्या तळेगावातील महाविद्यालयावर प्रशासनाची मोठी कारवाई