Video | विद्यार्थ्यांना 7 दिवसात शाळेतच मिळणार जात प्रमाणपत्र, आणखी काय सुविधा? समाजकल्याण आयुक्तांची महत्त्वाची माहिती
विद्यार्थ्यांकडे काही कागदपत्र व पुरावे नसल्यास जात पडताळणी समितीने ती प्रमाणित केल्यास जात प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. राज्यातील सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने ही सुविधा देण्यात येत असल्याचं आयुक्तांनी सांगितलं.
उस्मानाबाद : शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शाळेतच कास्ट सर्टिफिकेट (Cast Certificate) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून राज्यभर त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याची माहिती राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे (Prashant Narnavare) यांनी उस्मानाबादमध्ये दिली. विद्यार्थ्यांचे अनेक दाखले हे शाळेमध्ये असतात त्यामुळे जात पडताळणी समिती शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारेल व कागदपत्रांची (Documents) पूर्तता केल्यावर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन अवघ्या 7 दिवसात जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ होणार नाही. विद्यार्थ्यांकडे काही कागदपत्र व पुरावे नसल्यास जात पडताळणी समितीने ती प्रमाणित केल्यास जात प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. राज्यातील सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने ही सुविधा देण्यात येत असल्याचं आयुक्तांनी सांगितलं.

'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा

शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट

पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का

'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा
