मोठी बातमी! मोदी, शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतानाच भाजपला मोठा धक्का, बडा नेता काँग्रेसमध्ये

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे, बड्या नेत्यानं पक्षाची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

मोठी बातमी! मोदी, शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतानाच भाजपला मोठा धक्का, बडा नेता काँग्रेसमध्ये
bjpImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 7:52 PM

विधानसभा निवडणुकीसाठी येत्या वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान मतदानाला अवघे काही दिवस बाकी असतानाच आता भाजपला मोठा धक्का बसला आहे. सांगलीमध्ये भाजपला खिंडार पडले आहे. भाजपचा सांगलीमधील अल्पसंख्यांक चेहरा असलेले नेते मुन्ना कुरणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीमध्ये मुन्ना कुरणे हे स्वग्रही परते आहेत. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सांगलीचे जुने काँग्रेस नेते आणि सध्याचे भाजपा नेते मुन्ना कुरणे यांनी आज आपल्या सर्व समर्थकांसह भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत मुन्ना कुरणे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  गेल्या अनेक महिन्यापासून भाजपामध्ये मुन्ना कुरणे यांची कोंडी सुरू असल्याची चर्चा होती. त्यामुळे ते पक्षात फारसे सक्रीय देखील नव्हते. अखेर आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुन्ना कुरणे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत डॉक्टर विश्वजीत कदम, सांगलीचे काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुन्ना कुरणे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

भाजपाकडे मुन्ना कुरणे यांच्या रुपाने सांगलीत एक मुस्लिम चेहरा होता, मात्र त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये मुस्लिम समाजाला पुरेस प्रतिनित्व मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कुरणे यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे आज भाजपचे दोन्ही बडे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच सांगलीमध्ये भाजपला धक्का बसला आहे. मुन्न कुरणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश झाल्यानं काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे मात्र भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सांगलीमध्ये भाजपकडून सुधीर गाडगीळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे, तर काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.