काँग्रेसला पुन्हा झटका, माजी आमदार उद्या काँग्रेस सोडणार; सुनील तटकरे यांचं ट्विट
राज्यात शिवसेना फुटली. त्यानंतर राष्ट्रवादी फुटली. तोपर्यंत काँग्रेसच्या एकाही नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली नव्हती. राज्यात काँग्रेस मजबूत असल्याचं मानलं जात होतं. पण गेल्या दोन महिन्यात काँग्रेसला एकामागोमाग अनेक धक्के बसले.
मिलिंद देवरा, अशोक चव्हाण, राजू वाघमारे आणि संजय निरुपम यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता आणखी एक बडा नेता काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहे. माजी आमदार मुश्ताक अंतुले हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मुश्ताक अंतुले हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. कोकणात त्यांचं मोठं वर्चस्व आहे. त्यांनीच आता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले यांचे राजकीय वारसदार आणि गेली 40 वर्षे राजकारणात कार्यरत असलेले महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या सोमवार दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता एमसीए लाउन्ज, गरवारे क्लब, वानखडे स्टेडियम मुंबई येथे हा प्रवेश सोहळा होणार आहे. दादांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य सर्वांना सोबत घेऊन विकासाची वाट चालत आहे, असं सुनील तटकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पक्ष सोडण्याचं कारण काय?
दरम्यान, मुश्ताक अंतुले यांचं पक्ष सोडण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तटकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये त्याचा उल्लेख केलेला नाही. तसेच मुश्ताक अंतुले यांच्याकडूनही काही कारण आलेलं नाही. उद्या पक्ष प्रवेशाच्यावेळी अंतुले मीडियाशी संवाद साधतील. तेव्हाच त्यांचं पक्ष सोडण्याचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.
अजितदादा गटाचं बळ वाढलं
दरम्यान, कोकणात निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. हा प्रचार सुरू असतानाच आता कोकणातील अजितदादा गटाचं बळ वाढणार आहे. मुश्ताक अंतुले यांच्या प्रवेशानंतर अल्पसंख्याक वर्ग अजितदादा गटाकडे वळण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले साहेब यांचे राजकीय वारसदार आणि गेली ४० वर्षे राजकारणात कार्यरत असलेले महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे माजी अध्यक्ष, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार आहे.…
— Sunil Tatkare (@SunilTatkare) April 21, 2024
काँग्रेसची पडझड सुरूच
राज्यात शिवसेना फुटली. त्यानंतर राष्ट्रवादी फुटली. तोपर्यंत काँग्रेसच्या एकाही नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली नव्हती. राज्यात काँग्रेस मजबूत असल्याचं मानलं जात होतं. पण गेल्या दोन महिन्यात काँग्रेसला एकामागोमाग अनेक धक्के बसले. काँग्रेसचे बडे नेते आणि दोन पिढ्यांपासून काँग्रेससोबत असलेल्या नेत्यांनीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला. संजय निरुपम आणि राजू वाघमारे यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसची चांगलीच पडझड झाली आहे.