ना वाल्मिक कराड, ना सुदर्शन घुले… संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आकाचं नाव पहिल्यांदाच समोर; वकिलाच्या दाव्यानं खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आमदार सुरेश धस यांच्याकडून सारखा आकाचा उल्लेख करण्यात येत आहे, या आकाबद्दल वकिलाकडून कोर्टात खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

ना वाल्मिक कराड, ना सुदर्शन घुले... संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आकाचं नाव पहिल्यांदाच समोर; वकिलाच्या दाव्यानं खळबळ
Follow us
| Updated on: Jan 04, 2025 | 5:34 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणावरून राज्यभरात वातावरण चांगलंच तापलं आहे. आज या प्रकरणातील आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि  सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे, तर आरोपींना मदत करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबईतून अटक करण्यात आली. या आरोपींच्या अटकेनंतर पोलिसांकडून त्यांना केज कोर्टात हजर करण्यात आलं. केज कोर्टानं आरोपीचे वकील आणि पोलिसांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना 18 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान युक्तिवाद सुरू असातना आरोपीच्या वकिलाने कोर्टात खळबळजनक दावा केला आहे. आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. ते या प्रकरणात सातत्यानं आकाचा उल्लेख करत आहेत. आता हा आका नेमका कोण आहे? याबाबत आरोपीच्या वकिलाकडून खळबळजनक दावा करण्यात आला आहे,  आका- आका म्हटलं जातय तो आका म्हणजे विष्णू चाटे हाच आहे, तो आधीपासूनच कोठडीत आहे, असा दावा आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आला.

कोर्टात नेमकं काय घडलं? 

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आरोपी असलेल्या सुदर्शन घुले आणि  सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे, तर त्यांना मदत कणाऱ्या एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली. दरम्यान त्यानंतर पोलिसांनी या आरोपींना केज कोर्टात हजर केलं. आरोपीची 15 दिवसांच्या रिमांडची मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येचा आजीबात पश्चताप नसल्याचं पोलिसांनी कोर्टात म्हटलं होतं.  तर दुसरीकडे  आरोपींना हत्येचा पश्चताप नाही असं म्हणता येणार नाही   आरोपींच्या कोठडीसाठी एसआयटीकडे  असलेलेले मुद्दे पुरेसे नाहीत. जवळपास या गुन्ह्यातल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. विष्णू चाटे यालाही आधीपासूनच अटक करण्यात आलेली आहे. असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आला.

चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.