अनेक मंत्र्यांचे फोन टॅप, जितेंद्र आव्हाडांचे आयपीएस रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

अनेक मंत्र्यांचे फोन टॅप, जितेंद्र आव्हाडांचे आयपीएस रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 10:13 PM

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रश्मी शुक्ला यांनी वेगळ्याच नावांनी फोन टॅपिंगच्या परवानग्या घेऊन अनेक मंत्र्यांचे फोन टॅप केल्याचा धक्कादायक आरोप आव्हाड यांनी केलाय. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचा इशारा दिलाय (Serious allegations on IPS Rashmi Shukla by Minister Jitendra Awhad about Phone tapping).

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “कोणाचाही फोन टॅप करायचा असेल तर त्याला गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची परवानगी आवश्यक असते. रश्मी शुक्ला यांनी अशा प्रकारची परवानगी गेतली होती का? त्याचे उत्तर सिताराम कुंटे यांनी नाही असे दिले आहे. रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगची अतिशय वाईट सवय होती. हे आधीच्या सरकारापासून सुरु होतं. त्यांचं एक पत्र उघडकीला आलं आहे. यात त्यांनी माझी चुकी झाली असल्याचं सांगत माफी मागितली आहे.”

“रश्मी शुक्ला यांनी परवानगी एकाच्या नावाने घेतली आणि फोन टॅपिंग दुसऱ्या लोकांचे केलेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात हे सर्व प्रकार केले आहेत. त्याचा उपयोग आता महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विरुद्ध होतोय. फोन टॅपिंग करणं हा मोठा गुन्हा आहे. जर फोन टॅपिंग करायचे असेल तर संबंधित व्यक्तीची सविस्तर माहिती ज्यात नाव, नंबर दिला गेला पाहिजे,” असंही जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केलं.

‘परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार’

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “केंद्र सरकारने काही नियम दिले आहेत. त्यात कोणत्या प्रकारात फोन टॅप करता येतात याविषयी सांगण्यात आले आहे. यात राष्ट्र घातक कृत्य, परकीय देशातील अतिरेकी संघटनेशी संबंध या प्रकारांशिवाय इतर परिस्थिती फोन टॅपिंग करता येत नाही. याला अपवाद येथी शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीचा फोन टॅप करु शकतो. त्यामुळे रश्मि शुक्ला यांनी जी कारणं दिली होती ती संयुक्तिक नव्हती. त्यांनी ज्या फोन टॅपिंगच्या परवानग्या घेतल्या त्या चुकीच्या नावाने घेतल्या होत्या. परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार करण्यात आला. यात अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. हा राईट टू प्रायव्हसीचा भंग आहे. हे अनेकवेळा करण्यात आलं.”

‘रश्मी शुक्लांनी नोकरशाहांचा विश्वासघात करुन गद्दारी केली’

“फोन टॅप करुन ठेवायचे आणि त्याचा नंतर वापर करायचा हे सर्व प्रकार रश्मी शुक्ला यांनी केले आहेत. रश्मी शुक्ला यांनी आपल्यावरील वरिष्ठ नोकरशाहांचा विश्वासघात करुन गद्दारी केली आणि पोलीस विभाग आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम केलं. त्यानंतर त्याला बदल्यांमधील भ्रष्टाचाराची जोड दिली. ज्यांच्या बदल्या झाल्या ती नावं इतके चिल्लर आहेत की त्यांचे फोनही कुणी घेणार नाहीत. त्यातला महादेव इंगोले कोण आहे हे तुम्ही शोधा, तो कुणाशी संबंधित आहे. हे एक षडयंत्र रचलं गेलंय,” असंही त्यांनी नमूद केलं.

रश्मी शुक्ला महाविकास आघाडीला बदनाम करण्याच्या षडयंत्राच्या मुख्य

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “निष्कारण टॅपिंगच्या नावाखाली बदल्या, बदल्यांच्या नावाखाली मोठं रॅकेट असं महाराष्ट्र विकास आघाडीला बदनाम करण्याच्या षडयंत्राचा मुख्य कोणी असेल तर त्या रश्मी शुक्ला आहे.”

कोण आहेत रश्मी शुक्ला?

  • रश्मी शुक्ला या 1988 बॅचच्या आयपीएस आहेत.
  • नागरी संरक्षण विभागाच्या महासंचालक असलेल्या रश्मी शुक्ला यांची फेब्रुवारी 2021 मध्ये केंद्रात प्रतिनियुक्ती झाली
  • राज्य सरकारने 6 महिन्यापूर्वी त्यांची नागरी संरक्षण विभागात बदली केली होती. मात्र तुलनेने कमी महत्त्वाचे पद असल्याने त्यांनी निवृत्तीपर्यंत म्हणजे 2024 पर्यंत प्रतिनियुक्तीवर जाण्याचा निर्णय घेतला.
  • देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात, रश्मी शुक्ला यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या होत्या. त्यांची पुणे आयुक्तपदी वर्णी लागली होती. पण महाविकास आघाडीच्या काळात त्यांना तुलनेने कमी महत्त्वाचे पद मिळाले.
  • पुण्यात आयुक्त म्हणून रुजु होण्यापूर्वी शुक्ला या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या  (एसआयडी) आयुक्त होत्या.

हेही वाचा :

रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट, बेकायदेशीरपणे विरोधकांचे फोन टॅप करायच्या; राष्ट्रवादी काँग्रेसचा पलटवार

परमबीर सिंगांचा दुसरा मोठा दावा, रश्मी शुक्लांनीही देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती दिली होती!

तणावाच्या स्थितीत महाराष्ट्राला नवा पोलीस महासंचालक मिळाला!

व्हिडीओ पाहा :

Serious allegations on IPS Rashmi Shukla by Minister Jitendra Awhad about Phone tapping

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.