Dilip Sopal | राष्ट्रवादीला धक्के सुरुच, आमदार दिलीप सोपल यांचा राजीनामा, शिवबंधन बांधणार

बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल (NCP MLA Dilip Sopal) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. दिलीप सोपल हे 28 तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Dilip Sopal | राष्ट्रवादीला धक्के सुरुच, आमदार दिलीप सोपल यांचा राजीनामा, शिवबंधन बांधणार
Follow us
| Updated on: Aug 26, 2019 | 11:43 AM

सोलापूर : बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल (NCP MLA Dilip Sopal) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. दिलीप सोपल हे 28 तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती सुरुच आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार दिलीप सोपल (NCP MLA Dilip Sopal) शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु होती. अखेर दिलीप सोपल यांनी राजीनामा देऊन त्यावर शिक्कामोर्तब केलं.

दिलीप सोपल (NCP MLA Dilip Sopal)  यांनी काही दिवसांपूर्वीच कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले दिलीप सोपल शिवसेनेत जाणार असल्याने सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का आहे.

दिलीप सोपल यांनी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला दांडी मारून, काही दिवसापूर्वीच बार्शीत आपल्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेतला होता. आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना आपण समजावून घेणार असून आठ दिवसात आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सोपल यांनी सांगितलं होतं.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला दिलीप सोपल यांनी दांडी मारली होती.  मग मुंबईच्या बैठकीला दांडी मारून आपल्या समर्थक कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेतला. त्यामुळे आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे संकेत होते.

दिलीप सोपल कोण आहेत?

  • दिलीप सोपल बार्शी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात.
  • आघाडी सरकारमध्ये विविध मंत्रालयांची जबाबदारी त्यांनी सांभाळली.
  • दिलीप सोपल पहिल्यांदा 1985 मध्ये आमदार झाले, तेव्हापासून 2014 पर्यंत पाच वेळा ते निवडून आले आहेत. 2004 मध्ये त्यांचा पराभव झाला होता.
  • सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क ही जमेची बाजू
  • अजित पवारांशी मैत्रीचे संबंध, शरद पवारांशी काँग्रेसच्या काळापासून एकनिष्ठ नेता अशी त्यांची ओळख आहे.
  • राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य म्हणून ओळख
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.