Amarnath Cloudburst: अमरनाथ ढगफुटी दुर्घटनेनंतर आळंदीचे सात जण बेपत्ता? गुरू कृपा यात्रा कंपनीच्या माध्यमातून 200 यात्रेकरू गेले होते यात्रेला

अमरनाथ येथे शुक्रवारी झालेल्या ढगफुटीच्या घटनेनंतर मोठी जिवीत हानी झाली आहे. आत्तापर्यंत या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती असून, 40 बेपत्ता असल्याची माहिती आहे. याच काळात आळंदीतून आलेले सात यात्रेकरु बेपत्ता झाल्याची माहिती आहे. आळंदीमधील गुरू कृपा यात्रा कंपनीच्या माध्यमातून 200 यात्रेकरू अमरनाथ यात्रेत सहभागी झाले होते. त्यातील सात जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांना या घटनेनंतर पाहिले असल्याचा दावा यात्रा कंपनीच्या चालकाने केला आहे.

Amarnath Cloudburst: अमरनाथ ढगफुटी दुर्घटनेनंतर आळंदीचे सात जण बेपत्ता? गुरू कृपा यात्रा कंपनीच्या माध्यमातून 200 यात्रेकरू गेले होते यात्रेला
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 4:08 PM

पिंपरी-चिंचवड : शुक्रवारी सायंकाळी अमरनाथ (Amarnath cloudburst) गुहेजवळ ढगफुटी सदृश्य पावसामुळे झाल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे, तर 50 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत अनेक जम बेपत्ता झाले आहेत. अमरनाथ ढगफुटी दुर्घटनेनंतर आळंदीचे सात जण बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गुरू कृपा यात्रा कंपनीच्या माध्यमातून 200 यात्रेकरू यात्रेला गेले होते. यात बेपत्ता झालेल्या या सात भाविकांचा समवेश होता.

अमरनाथ येथे शुक्रवारी झालेल्या ढगफुटीच्या घटनेनंतर मोठी जिवीत हानी झाली आहे. आत्तापर्यंत या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती असून, 40 बेपत्ता असल्याची माहिती आहे. याच काळात आळंदीतून आलेले सात यात्रेकरु बेपत्ता झाल्याची माहिती आहे. आळंदीमधील गुरू कृपा यात्रा कंपनीच्या माध्यमातून 200 यात्रेकरू अमरनाथ यात्रेत सहभागी झाले होते. त्यातील सात जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांना या घटनेनंतर पाहिले असल्याचा दावा यात्रा कंपनीच्या चालकाने केला आहे.

आळंदीतून 200 यात्रेकरु हे गुरुकृपा यात्रा कंपनीच्या माध्यमातून अमरनाथला गेलो होते. 25 जूनला हे भाविक अमरनाथच्या यात्रेसाठी पोहचले असल्याची माहिती आहे. कालच्या ढगफुटीच्या घटनेनंतर यातील सात जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते आहे. तर त्यांना घटनेनंतर पाहिले असल्याचे शुभम खेडेकर या यात्रा कंपनी चालकाने सांगितले आहे. आता या सात जणांचा शोध घेण्याचे काम सुद्धपातळीवर सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

बेपत्ता झालेल्यांची नावे

  1. अनुसया वाहिले, आळंदी
  2.  मंगल ढेरे ,आळंदी
  3. लता झेंडे, हंडेवाडी
  4. सुलभा पाटील लोहगावॉ
  5. शालिनी पाटील ,लोहगाव
  6. अनिता जाधव, हंडेवाडी
  7. प्रज्ञा जाधव, मोशी

ढगफुटीच्या दुर्घटनेनंतर यांचा संपर्क झालेला नाही. घटनास्थळी यांचा शोध सुरु आहे. देशातील अनेक राज्यात पूरजन्य स्थिती आहे. तसेच काश्मीरमध्ये देखील मागच्या काही दिवसात मुसळधार पाऊस सुरु आहे. ढगफुटी झाल्यामुळे तिथं मोठा पूर आला आहे.

शुकवारी संध्याकाळी 5. 30 च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. ज्यावेळी ढगफुटी झाली त्यावेळी गुफेजवळ 10 ते 15 हजार भाविक उपस्थित होते. ढगफुटीनंतर सिंध नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी पोहचल्या आणि त्यांनी तात्काळ बचावकार्य सुरु केले. पावसामुळे जवानांना मदत कार्यात अडथळे येत आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.