Shahaji Bapu Patil : ‘काय झाडी, काय डोंगुर, काय हाटील…’ व्हायरल झालेल्या शहाजीबापूंचा दुष्काळी पट्टा ते गुवाहाटी प्रवास!

ती झाडी, ते डोंगर आणि ते हॉटेलं पाहून शाहजीबापू पाटील एवढे हारकून का गेले? असा सवाल अनेकांना पडला आहे. मात्र आसाममधील झाडी आणि डोंगर पाहून बापूंना आनंद होण्याची कारणही तशीच आहेत.

Shahaji Bapu Patil : 'काय झाडी, काय डोंगुर, काय हाटील...' व्हायरल झालेल्या शहाजीबापूंचा दुष्काळी पट्टा ते गुवाहाटी प्रवास!
शहाजी बापू पाटलांचं ऑडिओ क्लिपमधील संभाषण जसंच्या तसं! Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 9:54 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं राजकीय बंड हे सध्या देशभरात चर्चेत आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात या बंडापेक्षाही एक आमदार जास्त व्हायरल होत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार शाहजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्या ‘काय झाडी, काय डोंगुर, काय हाटील’ या वाक्यावर सध्या मीम्स बनत आहेत. एका आमदाराला सर्व सोयीसुविधा चांगल्या प्रकारे मिळत असतात. मग गुवाहाटीतली (Guwahati) निसर्ग बघून शहाजीबापू भारावले.  त्यांनी आपल्या मतदारसंघातील एका कार्यकर्त्याला फोन केला आणि मनमोकळा संवाद साधला. त्या संवादातील त्यांचं एक वाक्य आज चर्चेचा विषय ठरतंय.  ‘काय झाडी, काय डोंगुर, काय हाटील’ हेच ते वाक्य आहे.  ती झाडी, ते डोंगर आणि ते हॉटेलं पाहून शाहजीबापू पाटील एवढे हारकून का गेले? असा सवाल अनेकांना पडला आहे. मात्र आसाममधील झाडी आणि डोंगर पाहून बापूंना आनंद होण्याची कारणही तशीच आहेत. त्यातलं एक प्रमुख कारण म्हणजे बापुंचा मतदारसंघ, बापू सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात आणि हा मतदारसंघ दुष्काळी भाग म्हणून ओळख आहे.

दुष्काळी पट्टा अशी तालुक्याची ओळख

सांगोला तालुक्याला सुरूवातीपासून दुष्काळी पट्टा म्हणून ओळखले जाते. म्हणून या तालुक्यातील लोक कमी पाण्यात येणारं डाळिंबाचं उत्पादन घेतात. तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र काही भागातील पाण्याचा प्रश्नही हा अजूनही सुटला नाही. अनेक गावातील नागरिकांना अजूनही पाण्यासाठी वणवण करावी लागते. सांगोला तालुक्यातल्या काही भागात तर फक्त माळरान आणि दगड, धोंडेच पाहायला मिळतात. त्यामुळं बापुंना आसाममधील झाडं आणि डोंगर बघून त्याचं कौतुक वाटणं स्वाभाविक आहे. महत्वाची बाब म्हणजे शहाजीबापू अलिशान हॉटेलमध्येही जाऊन तालुक्याला विसरले नाहीत. हे त्यांच्या फोनवर बोलण्याच्या सुरूवातीलाच कळतं. हा तालुका अजूनही टेंभू म्हैसाळ योजनच्या पाण्यासाठी भांडताना दिसतो. तर कधी भाटघर धरणाच्या पाण्यासाठी भांडताना दिसतो.

काय झाडी…हाय डोगुर, काय हाटील.. ऐका

बापुंची राजकीय कारकीर्द

अशा दुष्काळी तालुक्यातून शहाजीबापू पाटील हे पहिल्यांदा आमदार म्हणून 1995 मध्ये विधानसभेवर निवडून आले. मात्र त्यावेळी बापु काँग्रेसमध्ये आणि सत्ता आली ती शिवसेना आणि भाजपची. त्यामुळे बापूंना विरोधी बाकांवर बसावं लागलं. असं असतानाही बापुंनी जनतेची अनेक कामं केली. यावेळी बापुसमोर दिवंगत नेते आणि सर्वाधिक वेळा आमदार म्हणून निवडून आलेले गणपतराव देशमुख यांचं आव्हान होतं. मात्र अगदी थोडक्या मतांनी का होईना बापुंनी 1995 मध्ये निवडणुक जिंकली. त्यानंतर मात्र पुन्हा गपतराव देशमुखांनी तालुक्यावर अशी पकड बनवली की विधानसभेत तब्बल 11 वेळा निवडून जाण्याचा मान गणपतराव देशमुखांना मिळला आहे.

राऊतांवरही उघड नाराजी

प्रतिस्पर्धी असूनही गणपतरावांचा नेहमी सन्मान

गणपतराव देशमुख हे किती दिग्गज आणि निष्ठावंत राजकारणी होते हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र शाहजी पाटील हे त्यांचे तालुक्यात राजकीय विरोधक, म्हणजेच दरवेळी विरोधात निवडणूक लढणारे कट्टर प्रतिस्पर्धी होते. मात्र तरीही त्यांनी एकमेकांना सन्मानाने वागवलं. तसेच आता बापू सांगोला तालुक्याचे आमदार आहे. आपल्या कार्यकर्त्याशी फोनवर बोलताना त्यांच्या मनात गणपतराव देशमुखांबाबत किती आदर आहे हे पाहायला मिळतं. इतकंच नाही गणपतरावांप्रती असलेली आत्मियताही यातून दिसते. एवढं प्रेम असणारा आपला आदर्श राजकारणी गणपतरावांना आदरांजली वाहताना बापूंना विधान भवनात भाषण करायला मिळालं नाही, ती खदखदही ते या फोनमध्ये बोलून दाखवतात. तसेच त्यांच्या भाषणाच्या ओळी काय होत्या हेही त्यांनी याच संभाषणात बोलून दाखवलं आहे.

तीही व्यथा ऐका

लुगडं घेऊ शकलो नाही, जमीन गेली…

1995 नंतरही येणारी प्रत्येक निवडणूक शाहजीबापू पाटील हे गणपतरावांविरोधात लढत राहिले. मात्र त्यांना यश मिळालं नाही. या अनेक वर्षांच्या सत्ता संघर्षात बापुंना आपल्या संपत्तीतील अनेक गोष्टी विकाव्या लागल्याचेही बोलले जाते. कारण आमदारकीची निवडणूक लढवणे हे काही खायचं काम नाही. त्यासाठी पैसा तर लागणारच. त्यामुळे बापू या फोनमध्ये जमीन गेली, पाटलाची बायको असून लुगडं घेऊन शकलो नाही, म्हणत आपली व्यथा कार्यकर्त्यांना सांगत आहेत.

अजित पवारांवर नाराजी

मागच्या निवडणुकीत बापुंचं पुन्हा जोरादर कमबॅक

अनेकवेळा गणपतराव देशमुखांविरोधात लढून हार पत्करलेल्या आणि सर्व काही गमावलेल्या बापुंनी हार न मानता 2019 च्या निवडणुकीत पुन्हा जोरदार तयारी केली. यावेळी निवडणुकीआधीच काही दिवस बापुंनी शिवसेनेत प्रवेश केला होता.  मात्र गणपतराव देशमुखांनी माझं वय झालंय. मी निवडणूक लढवणार नाही म्हणत निवडणुकीतून माघार घेतली. त्या ठिकाणी दुसऱ्या एका कार्यकर्त्याला संधी दिली गेली. गणपतराव देशमुख धनगर होते आणि तालुक्यात धनगरांची संख्या जास्त आहे म्हणून हा निर्णय घेतल्याचेही बोलले गेले.

शरद पवारांबाबतही मोठं वक्तव्य

शेकापने ऐनवेळी उमेदवार बदलला

मात्र शेकापने ऐनवेळा उमेदवार बदलला आणि गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली. मात्र यावेळी गणतराव देशमुख हे मैदानात नसल्याने बापुंसाठी अनिकेत देशमुख हा पैलवान तसाच नवाच होता. आपल्या राजकीय डावपेच वापरत बापुंनी अनिकेत देशमुखांना धोबीपछाड दिली आणि तालुक्यावर पुन्हा सत्ता मिळवली.

सत्तेत असूनही बापुंची निराशा

आता एवढ्या वर्षांचा संघर्ष करून आल्यावर बापुंना किमान आत्ता तरी आपल्या मनातली कामं पूर्ण होतील अशी आशा लागली होती. राजकारणाचा एवढा प्रदीर्घ अनुभव आणि गणपतराव देशमुखांच्या मतदारसंघातून आल्यावर आघाडी सरकार आपल्याला मान देईल ही अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र निराशा झाल्याचं, तसेच अजित पवार यांच्याकडून कशा प्रकारे कोंडी झाली, हे बापू बोलून दाखवतच आहेत. बापुंच्या या ऑडिओ क्लिपबाबत बापुंनी अजून तरी काही प्रतिक्रिया दिली नाही. आता हे राजकीय डावपेच  चालतच राहतील, मात्र तालुक्यासाठी असणारी बापुंची ही तळमळ मात्र नक्कीच लक्षात घेण्यासारखी आहे.

गणपतरावांविषयी तळमळही ऐका

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.