पुन्हा मोठा भूकंप? ठाकरेंच्या आमदारांचं आमच्यासोबत बोलणं झालं, शंभुराज देसाई यांनी बॉम्बच फोडला

या शपथविधी सोहळ्यानंतर आता शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंच्या आमदारांचं आमच्यासोबत बोलणं झालं आहे, असे शंभुराज देसाई म्हणाले.

पुन्हा मोठा भूकंप? ठाकरेंच्या आमदारांचं आमच्यासोबत बोलणं झालं, शंभुराज देसाई यांनी बॉम्बच फोडला
शंभुराज देसाई
Follow us
| Updated on: Dec 06, 2024 | 3:17 PM

Shambhuraj Desai On Uddhav thackeray : महाराष्ट्रात नुकतंच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह भाजपचे वरिष्ठ मंत्रीही उपस्थितीत होते. या शपथविधी सोहळ्यानंतर आता शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंच्या आमदारांचं आमच्यासोबत बोलणं झालं आहे, असे शंभुराज देसाई म्हणाले.

शंभुराज देसाई यांनी नागपुरातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे. यावेळी त्यांनी संजय राऊतांबद्दलही भाष्य केले. “ठाकरे गटाच्या आमदारांचं आमच्यासोबत बोलणं झालं आहे. त्यांच्या चर्चेतून तिथे खदखद असल्याचं लक्षात येत आहे. ही खदखद संजय राऊत यांच्यामुळे आहे. संजय राऊत यांच्यामुळे उद्धव ठाकरे गटाला खूप मोठा धोका आहे”, असे विधान शंभुराज देसाई यांनी केले.

आता उद्धव ठाकरे गट शिल्लकच राहिलेला नाही

“उद्धव ठाकरे गटातील अनेक आमदार संजय राऊत यांच्याबद्दल खाजगीमध्ये काही सांगतात. त्यांच्या वागण्यामुळे ही वेळ आली आहे. हा संजय राऊत यांना सावधगिरीची इशारा आहे. नाहीतरी आता उद्धव ठाकरे गट शिल्लकच राहिलेला नाही. २०१९ च्या निकालानंतर आमदारांची बैठक घेऊन बोट दाखवत तुमच्यापैकी मुख्यमंत्री करणार असं बोलते होते. पण नंतर ते बोट स्वत:कडे फिरलं आणि ते मुख्यमंत्री झाले. तेव्हा मुख्यमंत्री करायला शिवसैनिक दिसला नाही”, अशीही टीका शंभुराज देसाईंनी म्हटले.

…त्याला संजय राऊत जबाबदार

“उद्धव ठाकरे यांना महाविकासआघाडी कोणी करायला लावली. हे महाराष्ट्राला माहित आहे. उबाठाची जी अवस्था झाली, त्याला संजय राऊत जबाबदार आहेत. अजित पवार आज आले नाही. पण काही खात्यात कमी जास्त होणार आहे. ॲडजस्टमेंट करावी लागेल. मंत्रीपदाची नावं फायनल झाल्यावर कळतो की हा क्रायटेरीया होता”, असे शंभुराज देसाईंनी म्हटले.

“तुम्ही एक प्रयोग करा. २४ तासांत संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य खरे ठरले का? १० पैकी एकंही वाक्य खरं ठरतं नाही. आमचं सरकार पडेल असं संजय राऊत म्हणत होते. पडलं का? आम्ही पुन्हा आलोय. संजय राऊत यांच्या वक्तव्याकडे गांभीर्यानं घेऊ नका”, असे शंभुराज देसाई म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.