संजय राऊत यांचं गणित कच्चं आहे, लोकसभेच्या निकालानंतर बोला – शंभूराज देसाई यांचा टोला

आता जो शिवसेना फडणवीस गट आहे, त्यांनी स्वतःच्या जागा कमी करून घेतल्या. याला लोटांगण घालणं बोलतात अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. मात्र त्यांच्या या टीकेला शिंदे गटातील नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत यांचं गणित कच्चं आहे, असे म्हणत देसाई यांनी राऊतांना टोला लगावला

संजय राऊत यांचं गणित कच्चं आहे, लोकसभेच्या निकालानंतर बोला - शंभूराज देसाई यांचा टोला
Follow us
| Updated on: May 01, 2024 | 1:57 PM

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या राज्यातत आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू आहे. एकमेकांवर वाट्टेल ते आरोप करणारे राजकारणा आणि त्याला प्रत्युत्तर देणाऱ्या नेत्यांमुळे वातावरण भलंतच तापलं आहे. महायुतीविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही मोहीम उघडली असून शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. आता जो शिवसेना फडणवीस गट आहे, त्यांनी स्वतःच्या जागा कमी करून घेतल्या. याला लोटांगण घालणं बोलतात अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. मात्र त्यांच्या या टीकेला शिंदे गटातील नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत यांचं गणित कच्चं आहे, असे म्हणत देसाई यांनी राऊतांना टोला लगावला.

संजय राऊत कडाडले

सकाळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी शिंदे गट, फडणवीस आणि महायुतीच्या सर्वच नेत्यांवर टीका केली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून खदखद सुरू असतानाच राऊत यांनीही त्या मुद्यावरून सुनावले. आता जो शिवसेना फडणवीस गट आहे हे 12 13 जागा लढत आहेत, म्हणजे त्यांनी स्वतःच्या कमी करून घेतल्या. याला लोटांगण घालणं म्हणतात, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली होती.

मात्र महायुतीचे नेतेही काही कमी नसून शंभूराज देसाई यांनी राऊतांना चांगलंच सुनावलं. ‘ संजय राऊत यांचे गणित कच्च आहे. शिवसेनेचे तेरा खासदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आज आहेत. किमान 16 जागा तरी आम्ही शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर लढू 12 आणि 16 जागेतील फरक संजय राऊत यांनी समजून घ्यावा म्हणून म्हटलं की संजय राव यांचं गणित कच्च आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या निकालानंतर आम्ही 45 प्लस चा आकडा पार करू तेव्हा संजय राऊत यांनी बोलावं’ अशी प्रतिक्रिया देसाई यांनी दिली.

उद्धव ठाकरेंवरही केला पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पुण्यामध्ये सभा पार पडली. त्यांच्या सभेचं ठिकाण बरोबर होतं, रेसकोर्स. कारण त्यांना झोपेमध्ये सुद्धा घोडेबाजार दिसतो. पण त्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे होतं की हे घोडे वेगळे होते आणि तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतलं ते घोडे नाहीत खेचरं आहेत. मोदीजी तुम्ही घेतलेली गाढवं आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी काल एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर टीका केली होती.

निराशेपोटी उद्धव ठाकरेंची टीका

त्यांच्या या टीकेचाही शंभूराज देसाई यांनी समाचार घेतला. ‘उद्धव ठाकरे हे आता राज्यात फिरू लागले आहेत. त्यांच्याबरोबर मुळ शिवसेना नसल्याने त्यांना प्रतिसाद मिळत ना.ही त्यांच्याबरोबर असलेले लोक माणसं जमवू शकत नाहीत. संजय राऊतांसारखी विश्वज्ञानी लोक त्यांच्या सोबत असल्याने बाकीची लोकं जमत नाहीत, त्यामुळे ते निराशेपोटी अशी टीका करत आहेत, असा टोला शंभूराज देसाई यांनी लगावला.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.