VIDEO: कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस हातावर हात ठेवून बसणार नाही, shambhuraj desai यांचा सोमय्यांना इशारा
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टवर कारवाई व्हावी म्हणून भाजप नेते किरीट सोमय्या दापोलीकडे रवाना झाले आहेत. 100 वाहनांच्या ताफ्यासह असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन सोमय्या दापोलीकडे गेले आहेत.
मुंबई: परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या दापोलीतील रिसॉर्टवर कारवाई व्हावी म्हणून भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) दापोलीकडे रवाना झाले आहेत. 100 वाहनांच्या ताफ्यासह असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन सोमय्या दापोलीकडे गेले आहेत. तर, सोमय्या यांना रोखण्यासाठी शिवसैनिकही सज्ज झाले आहेत. तसेच दापोलीत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई (shambhuraj desai) यांनी सोमय्या यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस हातावर हात ठेवून बसणार नाही, असा इशाराच देसाई यांनी दिला आहे. तसेच सर्वांनीच कायदाचं पालन केलं पाहिजे. सोमय्या माजी खासदार आणि एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत. त्यांनी संयमाने वागावं. त्यांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला?, असा सवाल देसाई यांनी केला आहे.
शंभुराज देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा इशारा दिला. सोमय्या हे भाजपचे नेते म्हणून दापोलीला निघाले आहेत. ते माझी खासदार राहिलेले आहेत. कायद्याच पालन त्यांनी करायला हवं. त्यांनी पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा. एखाद्याच्या मालमत्तेमध्ये घुसायचं. अनिल परब यांचा त्याच्याशी काही संबंध नाही. हे कायद्याचं उल्लंघन आहे. सोमय्या यांनी कायद्याचं पालन करावं. त्यांच काही म्हणणं आहे ते महसूल यंत्रणेकडे द्यावं, असं शंभुराज देसाई यांनी सांगितलं.
केवळ राजकीय भांडवल सुरू
अशा प्रकारामुळे स्थानिक पर्यटनावर परिणाम होतो. कायदा सुवस्था पाळण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. अधिकाराच्या चौकटीत राहून कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश, असं त्यांनी सांगितलं. केवळ राजकीय भांडवल करण्यासातजी हे सगळं केल्याचं स्पष्ट होत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
बीएमसीवर एकहाती सत्ता येईल
मला मोहित कंबोज काय म्हणाले माहित नाही. पण आयुक्त हे कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करतात. शासनाच्या नियमात राहूनच काम करतात, असं ते म्हणाले. काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की, आम्ही हिंदुत्वाशी इंच भर देखील मागे हललो नाही. कोविडच्या काळात महाराष्ट्राला बाहेर काढलं आहे. चांगल काम केल तरी आरोप करायचे प्रकार सुरू आहे. पण शिवसेनेवर आणि मुंबईकरांवर तिळमात्र फरक पडणार नाही. पुन्हा बीएमसीवर आमची एकहाती सत्ता येईल, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
100 वाहनांचा ताफा, 10 तास प्रवास, कसा आहे Kirit Somaiya यांचा दौरा जाणून घ्या एका क्लिकवर
पूर्वी कुठे काही घडलं तर बोफोर्स झाला म्हणायचे, आता वाझे झाला म्हणतात, अजितदादांचे विरोधकांना चिमटे
Maharashtra News Live Update : महागाईच्या विरोधात काँग्रेसचं देशव्यापी आंदोलन