अजून पंधरा वर्षे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष सत्तेत येणार नाही, दिवाळी आहे म्हणून जास्त बोलत नाही, शंभुराज देसाई काय म्हणाले…

| Updated on: Oct 24, 2022 | 10:56 PM

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील काही नेत्यांना सत्तेविना राहवत नाही, सत्तेविना ते राहू शकत नाही. सत्तेविना ते तळमळत आहे, असं देसाई म्हणाले.

अजून पंधरा वर्षे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष सत्तेत येणार नाही, दिवाळी आहे म्हणून जास्त बोलत नाही, शंभुराज देसाई काय म्हणाले...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

सातारा : राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांच्या एका विधानावर बोलत असतांना राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष (NCP) अजून पंधरा वर्षे सत्तेत येणार नाही असा दावा केला आहे. नुकतेच रामराजे नाईक-निंबाळकर यांनी राज्यात जे राजकारण सुरू आहे, ते असेच सुरू राहिले तर लोकशाही टिकणार नाही, त्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने पुढे आले पाहिजे असं म्हंटले होते. त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी पलटवार केला आहे. जर राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस सत्तेत आली तर लोकशाही टिकली, आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस सत्तेतून बाजूला गेली की लोकशाही धोक्यात आली, पण मला राजे साहेबांना सांगायचं आहे असं म्हणत आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो आहे. लोकशाही मार्गाने बहुमत सिद्ध केले आहे. लोकशाही मार्गानेच सभापती यांची निवड केली आहे. आपणही विधानपरिषदेचे सभापती होता, आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो आहेत, असं मंत्री देसाई यांनी म्हंटले आहे.

याशिवाय मंत्री शंभूराज देसाई यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्वतः पुरते पाहू नये, आजही सत्तेत येण्यासाठी बहुमताला महत्व आहे.

त्यांना खंत याची आहे की त्यांचा पक्ष सत्तेत नाही, सत्तेत नसल्यामुळे लोकशाही धोक्यात किंवा टिकणार नाही असे म्हणून चालत नाही.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील काही नेत्यांना सत्तेविना राहवत नाही, सत्तेविना ते राहू शकत नाही. सत्तेविना ते तळमळत आहे, असं देसाई म्हणाले.

याशिवाय पुढील अडीच वर्षे काय पुढील दहा ते पंधरा वर्षे ते तळमत राहील, असा टोला लगावत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या विधानावरुन देसाई यांनी थेट राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला लक्ष केले आहे.