महाविकास आघाडीबद्दल ‘ती’ भूमिका का मांडली? शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं…

येत्या 2024 मध्ये महाविकास आघाडी राहिल की तुटणार हे सांगता येत नाही, असं वक्तव्य पवार यांनी केलं होतं. आज त्यांनी यावर टीव्ही9कडे स्पष्टीकरण दिलं.

महाविकास आघाडीबद्दल 'ती' भूमिका का मांडली? शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं...
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 2:59 PM

मुंबई : महाविकास आघाडी 2024  च्या निवडणुकीत टिकेल की नाही हे आताच सांगू शकत नाही, या शरद पवारांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी राजकारण्यानं केलेल्या या वक्तव्यावरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे शरद पवार यांनीच यावरून स्पष्टीकरण दिलं. माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला गेला, असं पवार म्हणालेत. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्या भेटीत नेमकं काय झालं, याचाही खुलासा शरद पवार यांनी केलाय.

महाविकास आघाडीवर काय स्पष्टीकरण?

येत्या 2024 मध्ये महाविकास आघाडी राहिल की तुटणार हे सांगता येत नाही, असं वक्तव्य पवार यांनी केलं होतं. आज त्यांनी यावर टीव्ही9कडे स्पष्टीकरण दिलं. शरद पवार म्हणाले, ‘ महाविकास आघाडीत जागा वाटप निश्चित नाही. यामुळे मी तशी भूमिका मांडली पण त्याचा वेगळा अर्थ काढू नका . महाविकास आघाडी ऐक्य राहवं ही भूमिका असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं. पण नुसती इच्छा असून उपयोग नाही. तर जागावाटप झालं पाहिजे. तेच झालं नाही तर आतापासून काही सांगता येत नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.

प्रकाश आंबेडकरांसोबत काय चर्चा?

उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली. मात्र शरद पवार आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर एकत्र येणार नाही नाही, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत. त्यातच काल प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची भेट झाली. या भेटीत नेमकं काय झालं, यावरून आडाखे बांधले जात होते. शरद पवार यांनी सांगितलं, वंचित आघाडीशी चर्चा महाराष्ट्राविषयी झालेली नाही. कर्नाटकातल्या जागांसदर्भात चर्चा झाली. अन्य एक-दोन ठिकाणी आघाडी आहे. एकत्र काम करण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र अद्याप यावर काही निर्णय झालेला नाही…

राजकारणात खळबळ

अजित पवार यांच्या नॉट रिचेबल प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याच्या हालचालींवर, वक्तव्यावर नजर ठेवली जातेय. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच २०२४ मधील महाविकास आघाडी बाबत असं भाष्य केल्यानं राजकारणात खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांची भाजपाविरोधातील भूमिका मवाळ झाल्याचं दिसून येतंय. त्यातच अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा सुरु आहेत. तसेच दावेही मोठे नेते करत आहेत. अशा वातावरणात शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य गांभीर्याने घेतलं जातंय.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.