जितेंद्र आव्हाड यांच्या ‘त्या’ ट्वीटनंतर अजित पवार यांच्या गोटात खळबळ, शरद पवार यांची पहिली खेळी यशस्वी

राज्याच्या राजकारणाला अजित पवार यांच्या भूमिकेमुळे कलाटणी मिळाली आहे. अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांसोबत मोट बांधल्याने आमदार खासदार कोणासोबत असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यात आता जितेंद्र आव्हाड ट्वीट चर्चेत आलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या 'त्या' ट्वीटनंतर अजित पवार यांच्या गोटात खळबळ, शरद पवार यांची पहिली खेळी यशस्वी
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 2:42 PM

मुंबई : अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरु झाली आहे. अजित पवार यांनी भाजपा शिवसेनेसोबत सत्तेत स्थान मिळवत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे खरी राष्ट्रवादी कोणासोबत असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर अजित पवार यांना आणखी आमदार आणि खासदारांची साथ असल्याचं बोललं जात आहे. त्यातच शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्यासोबत असल्याची चर्चा रंगली होती. त्या चर्चेला आता त्यांनी ट्वीट करत पूर्णविराम दिला आहे. दुसरीकडे, तेच ट्वीट रिट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी एक मोहरा परत आणल्याचं बोललं आहे.

काय म्हणाले अमोल कोल्हे

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत स्पष्ट केलं आहे की, “जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं। मी साहेबांसोबत.” त्यांच्या या ट्वीटनंतर ते शरद पवार यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

खासदार अमोल कोल्हे यांचं ट्वीट रिट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी मोहरा परत आणल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. “पहिला मोहरा परत..!” असं ट्वीट करून शरद पवारांकडून घरवापसी सुरु झाल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता शरद पवार की अजित पवार असा नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार

माणिकराव कोकाटे (सिन्नर), नरहरी झिरवाळ (दिंडोरी), सुनील भुसारा (विक्रमगड), अतुल बेनके (जुन्नर), संग्राम जगताप (अहमदनगर), आशुतोष काळे (कोपरगाव), चेतन तुपे (हडपसर), सुनील शेळके (मावळ),  दिलीप मोहिते (खेड आळंदी), दत्तात्रय भरणे (इंदापूर), दौलत दरोडा (शहापूर), शेखर निकम (चिपळूण), सरोज अहिरे (देवळाली), किरण लहाने (अकोले), अशोक पवार (शिरूर), संजय बनसोडे (उदगीर), सुनील टिंगरे (वडगाव शेरी), निलेश लंके (पारनेर)

शरद पवार यांच्यासोबत असलेले आमदार

जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), राजेश टोपे (घनसावंगी), अनिल देशमुख (काटोल), जयंत पाटील (इस्लामपूर), बाळासाहेब पाटील (अहमदपूर), शामराव पाटील (कराड उत्तर), प्रकाश सोळंके (माजलगाव), राजेंद्र शिंगणे (सिंदखेड राजा), नवाब मलिक (अणुशक्ती नगर), प्राजक्त तनपुरे (राहुरी), बाळासाहेब आजबे (आष्टी), राजू कारेमोरे (तुमसर), मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव), दीपक चव्हाण (फलटण), अशोक पवार (शिरूर), मकरंद जाधव (वाई), चंद्रकांत नवघरे (बसमत), इंद्रनील नाईक (पुसद), मानसिंग नाईक (शिराळा), नितीन पवार (कळवण), रोहित पवार (कर्जत जामखेड), राजेश पाटील (चंदगड), सुमन पाटील (तासगाव कवठे महाकाळ), दिलीपराव बनकर (निफाड), यशवंत माने (मोहोळ), बबनराव शिंदे (माढा) संदीप क्षीरसागर (बीड)

केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.