आबा तुम्ही माझं ऐकलं असतं, तर आज तुम्ही आमच्यात असता, शरद पवार भावूक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (R R Patil) यांच्याविषयी बोलताना भावूक झालेले पाहायला मिळाले. आबा तुम्ही माझं ऐकलं नाही. जर तुम्ही माझं ऐकलं असतं, तर आज तुम्ही आमच्यात असता. पण दुर्दैव की रोगाने तुमच्यावर घाला घातला, अशी भावना शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केली.

आबा तुम्ही माझं ऐकलं असतं, तर आज तुम्ही आमच्यात असता, शरद पवार भावूक
Follow us
| Updated on: Sep 01, 2019 | 10:48 PM

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (R R Patil) यांच्याविषयी बोलताना भावूक झालेले पाहायला मिळाले. आबा तुम्ही माझं ऐकलं नाही. जर तुम्ही माझं ऐकलं असतं, तर आज तुम्ही आमच्यात असता. पण दुर्दैव की रोगाने तुमच्यावर घाला घातला, अशी भावना शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केली. ते सांगलीमध्ये (Sangli) आर. आर. पाटील ( R R Patil) यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “आबा तुम्ही माझं ऐकलं नाही. जर तुम्ही माझं ऐकलं असतं, तर आज तुम्ही आमच्यामध्ये असता. पण दुर्देवी रोगाने आबांवर घाला घातला. आबा तुम्ही माझ्यापेक्षा वयानं फार लहान होता.” माझ्यासारख्या माणसाच्या अगोदर आबा का गेले? असा भावनिक प्रश्नही शरद पवार यांनी यावेळी विचारला.

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीला इतकं मोठं भगदाड पडलेलं पाहायला मिळत आहे. सत्ता असताना सोबत असणारे अनेक नेते आज पक्षाला रामराम ठोकून सत्ताधारी पक्षात जात आहेत. अशावेळी शरद पवार यांचं पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या आर. आर. पाटलांविषयी भावनिक होणं सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

‘जीवाचा धोका पत्करून आबांनी कसाबला फाशी दिली’

शरद पवार यांनी आर. आर. पाटील यांच्याविषयी काही आठवणींना देखील उजाळा दिला. त्यांनी दहशतवादी कसाबला (Terrorist Ajmal Kasab) फाशीची शिक्षा देताना घडलेल्या घटना आणि त्यावर आर. आर. पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेचीही आठवण सांगितली.

शरद पवार म्हणाले, “दहशतवादी कसाबला फाशी देण्याच्या वेळी केंद्रीय गृह मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सावधानतेचा इशारा दिला होता. कसाबला फाशी दिल्यास राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. तसेच महाराष्ट्रातील ज्या गृहमंत्र्याच्या काळात कसाबला फाशी दिली जाईल, त्या गृहमंत्र्याच्या जीवाला आयुष्यभर धोका राहिल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली होती. मी आर. आर. आबांना ही माहिती सांगितली. मात्र, त्यांनी निर्भीडपणे आणि खंबीरपणे कायदा-सुव्यवस्थेची जबाबदार पार पाडली आणि कसाबला फाशी देण्यात आली.”

“आबा तुमची आठवण येते” : खासदार अमोल कोल्हे

दरम्यान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी या कार्यक्रमात आर आर पाटील यांच्याविषयी तयार केलेली कविता “आबा तुमची आठवण येते” सादर केली.

‘रोहित आर आर पाटील 2024 मध्ये तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून आमदार होणार’

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून 2019 ला सुमन आर आर पाटील आणि 2024 ला रोहित आर आर पाटील आमदार होतील असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.